*वाण्याविहीर परिसरात चोरीछुपे अवैध मद्य विक्रेत्यांकडे, हवालदाराची हप्ते वसुली, तर संध्याकाळी पोलीस निरीक्षकाने त्यांच्यावर कारवाई केल्याने आश्चर्य*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*वाण्याविहीर परिसरात चोरीछुपे अवैध मद्य विक्रेत्यांकडे, हवालदाराची हप्ते वसुली, तर संध्याकाळी पोलीस निरीक्षकाने त्यांच्यावर कारवाई केल्याने आश्चर्य*
*वाण्याविहीर परिसरात चोरीछुपे अवैध मद्य विक्रेत्यांकडे, हवालदाराची हप्ते वसुली, तर संध्याकाळी पोलीस निरीक्षकाने त्यांच्यावर कारवाई केल्याने आश्चर्य*
अक्कलकुवा(प्रतिनीधी):-अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर परिसरात चोरीछुपे सुरू असलेल्या अवैध मद्य विक्रेत्यांकडे काल दुपारी हवालदाराने हप्ते वसुली केली तर संध्याकाळी पोलीस निरीक्षकाने त्यांच्यावर कारवाई केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून या घटनेची परिसरात खमंग चर्चा सुरू आहे.
पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी संपूर्ण जिल्ह्यात सक्तीने अवैध धंदे बंद केले असून अवैध धंदे चालकांवर धडक कारवाईचे सत्र सुरू ठेवले असताना अक्कलकुवा तालुक्यातील अक्कलकुवा व मोलगी पोलीस ठाणे हद्दीत छुप्या रीतीने अवैध धंदे सुरू असल्याचे दिसून येत आहे. काल दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी अक्कलकुवा पोलीस ठाणे हद्दीतील वाण्याविहीर परिसरात अवैधपणे मद्यविक्री करणाऱ्यांकडे ठाण्यातील हवालदाराने दुपारच्या सुमारास हप्ते वसुली केली व संध्याकाळी त्या विक्रेत्यांवर थेट पोलीस निरीक्षकांनी धाड टाकून कारवाई केल्याने पोलिसांच्या या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त केले जात असून या प्रकाराची परिसरात खमंग चर्चा सुरू आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संपूर्ण जिल्ह्यात अवैध धंदे शक्तीने बंद केले असून अवैध धंदे चालकांवर कठोर कारवाई करण्याचे सत्र वर्षभरापासून सुरू ठेवले असताना अक्कलकुवा तालुक्यातील अक्कलकुवा व मुलगी पोलीस ठाणे हद्दीत स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने अवैध धंदे सुरू असल्याचे दिसून येत आहे. या अवैध धंदे चालकांवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून येणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील सावध करण्याचे काम स्थानिक विशिष्ट पोलीस कर्मचाऱ्यांकडून केले जात असल्याचे दिसून येत आहे एकंदरीत काही पोलीस कर्मचारी शिताफीने पोलीस अधीक्षकांच्या आदेशां कडे डोळे झाक करत असल्याचे समोर आले आहे.