*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदूरबार आणि आयसर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार येथे तीन दिवसीय विज्ञान आणि गणित प्रशिक्षण संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदूरबार आणि आयसर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार येथे तीन दिवसीय विज्ञान आणि गणित प्रशिक्षण संपन्न*
*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदूरबार आणि आयसर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार येथे तीन दिवसीय विज्ञान आणि गणित प्रशिक्षण संपन्न*
नंदूरबार(प्रतिनिधि):-जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार व भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेतील शाळांमध्ये इनोव्हेशन कोचेस तयार करण्यासंदर्भात तीन दिवसीय विज्ञान आणि गणित प्रशिक्षण संपन्न झाले. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार, आयसर पुणे, ब्रिटिश कौन्सिल, रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री, टाटा टेक्नॉलॉजीज आणि टाटा ट्रस्टस् यांच्या संयुक्त विद्यमाने संचलित आयराईझ iRISE टीचर डेव्हलमेंट प्रशिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यातील 18 ते 20 डिसेंबर दरम्यान तीन दिवसीय कॅस्केड प्रशिक्षणाची सुरुवात दरम्यान नंदुरबार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार येथे झाली. या कार्यक्रमाचे उद्धघाटन डायटचे प्राचार्य डॉ. राजेंद्र महाजन यांनी केले व प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्यात. या कार्यशाळेचे प्रयोजन हे आयराईज उपक्रमाअंतर्गत शिक्षकांना नवोपक्रम, STEM शैक्षणिक आशयज्ञान आणि मूल्यमापन साधनांवर मार्गदर्शन करण्यात आले. ह्या कार्यशाळेनंतर नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षक शाळेतील मुलांमध्ये गणित-विज्ञान या विषयाबद्दल सर्जनशीलता, समस्या सोडविण्याचा, नाविन्यपूर्ण दृष्टीकोन रुजवण्याचा प्रयत्न यांच्या द्वारे करतील. सर्व सत्रांचे नियोजन नंदुरबार जिल्ह्याचे इनोव्हेशन चॅम्पिअन्स, राहुल साळुंखे, अनंतकुमार सूर्यवंशी तसेच iRISE, आयशर पुणे टीमचे श्रीमती पल्लवी शेवाळे यांच्या द्वारे करण्यात आले. पल्लवी शेवाळे हे आष्टे,नंदुरबार येथील रहिवासी आहेत. विज्ञान विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र महाजन यांनी समन्वयक म्हणून कामकाज पाहिले. नंदुरबार जिल्ह्यातील 65 गणित व विज्ञान शिक्षकांनी या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या प्रशिक्षणात सर्व सहभागी शिक्षकांना प्रमाणपत्रे देण्यात आली. सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाच्या सांगता वेळी तज्ज्ञ मार्गदर्शकांचे आभार मानले. डॉ संध्या पटेल, श्रीमती कलाल यांनी मनोगतात या प्रशिक्षणाचा भरपूर आम्हास उपयोग होईल असे सांगितले तसेच येथे मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग विदयार्थ्यांसाठी करु असे सांगितले.
यावेळी डायटचे अधिव्याख्याता विनोद लवांडे, प्रदीप पाटील, सुभाष वसावे, डॉ वनमाला पवार, डॉ बाबासाहेब बडे, यजुवेंद्र देवरे, महेंद्र बारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सांगता वेळी मयूर पटेल, घनश्याम धनगर, रविंद्र पाटील, कैलास चौधरी, किशोर रुंदळ, प्रविण शिंदे,
हर्षा पटेल, राहुल मराठे, मनीषा कलाल यांना उत्कृष्ठ सहभागी म्हणून गौरवण्यात आले.