*तीन दिवसीय नंदुरबार प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचा समारोप सर्वसाधारण विजेतेपदाचे मान नवापूर पूर्वला*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*तीन दिवसीय नंदुरबार प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचा समारोप सर्वसाधारण विजेतेपदाचे मान नवापूर पूर्वला*
*तीन दिवसीय नंदुरबार प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचा समारोप सर्वसाधारण विजेतेपदाचे मान नवापूर पूर्वला*
नंदुरबार(प्रतिनीधी):-प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते.
नंदुरबार प्रकल्प अंतर्गत नंदुरबार, शहादा, नवापूर तालुक्यामध्ये तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा मध्ये विजयी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांची प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धेत निवड करण्यात आली होती. प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धेत एकूण 32 शासकीय व 30 अनुदानित आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. 1448 खेळाडू विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल हे सांघिक खेळ व धावणे, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक, लांबउडी, उंचउडी असे वैयक्तिक खेळ घेण्यात आली. तीन दिवसीय नंदुरबार प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचा समारोप करण्यात आला. सर्वसाधारण विजेतेपदाचे मान नवापूर पूर्वला मिळाला. विजयी संघ व खेळाडूंची नाशिक विभागाला निवड झाली आहे.
समारोपप्रसंगी विजयी संघाचे खेळाडू व शिक्षक तसेच सर्व मान्यवरांनी देखील नाचण्याचा आनंद घेत विद्यार्थ्यांमध्ये आनंद उत्सव साजरा केला. प्रकल्पस्तरीय स्पर्धा प्रकल्प अधिकारी डॉ.चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. समारोप प्रसंगी लेखाधिकारी सुंदरसिंग पावरा, सहाय्यक लेखाधिकारी चौरे
उपलेखापाल विक्रम पावरा, सहाय्यक प्रकल्प अधिकारी संजय काकडे, सायराबानु हिप्परगे, नंदकुमार साबळे, किरण मोरे, कार्यालयीन अधीक्षक योगेश बागल, कौशल्या पाडवी, शिक्षण विस्तार अधिकारी निर्मल माळी, प्रकाश वसावे, विजय सोनार, ज्ञानेश्वर माळी, आर. एन. निकम, डी. एन. सोनुने, आर. आर. गोसावी, शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील सर्व मुख्याध्यापक, अधीक्षक, शिक्षक, क्रीडा शिक्षक, व वर्ग चार कर्मचारी आदी उपस्थित होते.
खेळ प्रकार -कबड्डी
14 वर्षे खालील
नवापूर पूर्व मुले प्रथम नवापूर पश्चिम मुली, प्रथम
नंदुरबार मुले, द्वितीय नंदुरबार मुली, द्वितीय
17 वर्षाखालील
नवापूर पूर्व मुले, प्रथम नवापूर पश्चिम मुली, प्रथम नंदुरबार मुले, द्वितीय नवापूर पूर्व,द्वितीय 19 वर्षाखालील नवापूर पूर्व मुले, प्रथम नवापूर पूर्व मुली, प्रथम नंदुरबार मुले, द्वितीय नवापूर पश्चिम मुली, द्वितीय
खेळ प्रकार- खो-खो 14 वर्षाखालील
नवापूर पश्चिम मुले, प्रथम नवापूर पश्चिम मुली, प्रथम नंदुरबार मुले, द्वितीय नंदुरबार मुली, द्वितीय 17 वर्षाखालील नवापूर पूर्व मुले प्रथम नंदुरबार मुली प्रथम नंदुरबार मुले द्वितीय नवापूर पूर्व मुली द्वितीय 19 वर्षाखालील नवापूर पूर्व मुले प्रथम नंदुरबार मुली प्रथम नंदुरबार मुले द्वितीय नवापूर पश्चिम मुली द्वितीय खेळ प्रकार - हॉलीबॉल 14 वर्षाखालील नवापूर पूर्व मुले प्रथम
नंदुरबार मुली प्रथम
नवापूर पश्चिम मुले द्वितीय नवापूर पूर्व मुली द्वितीय 17 वर्षाखालील नवापूर पूर्व मुले प्रथम नंदुरबार मुली प्रथम नंदुरबार मुले द्वितीय नवापूर पश्चिम मुली द्वितीय 19 वर्षाखालील नवापूर पूर्व मुले प्रथम
नंदुरबार मुली प्रथम नंदुरबार मुले द्वितीय
खेळ प्रकार- हॅण्डबॉल 14 वर्षाखालील नवापूर पूर्व मुले प्रथम नवापूर पूर्व मुली प्रथम नवापूर पश्चिम मुले द्वितीय
नवापूर पश्चिम मुली द्वितीय 17 वर्षाखालील
नवापूर पूर्व मुले प्रथम नवापूर पूर्व मुली प्रथम नवापूर पश्चिम मुले द्वितीय
नवापूर पश्चिम मुली द्वितीय 19 वर्षाखालील
नवापूर पूर्व मुले प्रथम नवापूर पूर्व मुली प्रथम नवापूर पश्चिम मुले द्वितीय
नवापूर पश्चिम मुली द्वितीय प्रथम विजेता नवापूर पूर्व, द्वितीय विजेता नंदुरबार, तृतीय विजेता नवापूर पश्चिम, चतुर्थ विजेता शहादा सर्व विजय संघ व खेळाडूंची नाशिक विभागाला निवड झाली आहे.