*साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शनिमांडळ येथे क्रीडा सप्ताह साजरा करण्यात आला*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शनिमांडळ येथे क्रीडा सप्ताह साजरा करण्यात आला*
*साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शनिमांडळ येथे क्रीडा सप्ताह साजरा करण्यात आला*
नंदूरबार(प्रतिनिधि):-नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शनिमांडळ येथे क्रिडा सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य कुंदन पाटील यांची निवड करण्यात आली.
विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य कुंदन पाटील व पर्यवेक्षक व्ही बी रघुवंशी, जेष्ठ क्रीडा शिक्षक एस पी निकम यांच्या हस्ते क्रीडा साहित्यांचे पूजन केले व मशाल लावून व शांतीचे प्रतीक कबुतरांना आकाशात सोडून कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक तथा प्राचार्य कुंदन पाटील यांनी भाषण करतांना मैदानी खेळ ही काळाची गरज यावर विद्यार्थ्यांना भविष्यात होणाऱ्या त्रास मोबाईल बघणे, सतत वाकून बसणे, आणि मैदानात खेळायला न जाणे यामुळे होणारे दुष्परिणाम व मैदानी खेळायचे फायदे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, विद्यार्थ्यांमध्ये वाढते डिप्रेशन आणि स्नायू संदर्भात शारीरिक त्रास यापासून सुटका कसा मिळवता येईल यांन बद्दल माहिती दिली व क्रीडा सप्ताहाची सुरुवात मैदानात स्वतः खेळून केली.
विद्यार्थ्यांना बौद्धिक क्षमता सकट शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी खिलाडी वृत्ती तयार होण्यासाठी खेळाडूंचे संघटन, धैर्य, नेतृत्व हे संस्कार रुजण्यासाठी व यश अपयश सहन करण्याची क्षमता वाढावी या कारणामुळे विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य कुंदन पाटील पर्यवेक्षक व्ही बी रघुवंशी, जेष्ठ क्रीडा शिक्षक एस पी निकम व सांस्कृतिक प्रमुख किरण मोरे यांनी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात कबड्डी स्पर्धा, स्लो सायकल, तीन पायाची शर्यत, लिंबू चमचा, संगीत खुर्ची, 50 मीटर धावण्याची शर्यत, व मॅरेथॉन स्पर्धा इत्यादी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात इयत्ते प्रमाणे स्पर्धा आयोजित करण्यात आलेले होते यात बऱ्याच विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला
आजचे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी बी सोनवणे यांनी केले प्रास्ताविक एस पी निकम यांनी केले आभार प्रदर्शन किरण मोरे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत गाऊन करण्यात आले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.