*पथराई येथील डी पी गावित आयुर्वेद महाविद्यालयात जागतिक ध्यान दिनानिमित्त शिबिर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पथराई येथील डी पी गावित आयुर्वेद महाविद्यालयात जागतिक ध्यान दिनानिमित्त शिबिर*
*पथराई येथील डी पी गावित आयुर्वेद महाविद्यालयात जागतिक ध्यान दिनानिमित्त शिबिर*
नंदुरबार(प्रतिनीधी):-तालुक्यातील पथराई येथील डी पी गावित आयुर्वेद महाविद्यालयात जागतिक ध्यान दिनानिमित्त ध्यान दिनाचे महत्त्व पटवून ध्यान साधना शिबिर घेण्यात आले. त्यात सुमारे 300 विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सहभाग नोंदविला. पथराई येथील आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी संचलित डी पी गावित आयुर्वेद महाविद्यालयात आज 21 डिसेंबर रोजी जागतिक ध्यान दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी आर्ट ऑफ लिविंग चे समन्वयक हिरालाल महाजन यांनी ध्यान दिनाचे महत्त्व पटवून प्रात्यक्षिक करून दाखविले. ध्यान केल्याने माणसाच्या आयुष्यात सकारात्मक विचार निर्माण होतो व निरोगी राहण्यासाठी मदत होते. यावेळी संस्थेचे चेअरमन राजेंद्रकुमार गावित, सौ. इला गावित, डॉ. विभूती गावित, डॉ. ऋषिका गावित, वसंत पाटील, प्राचार्य सुयोग व्यास यांच्या उपस्थितीत जागतीक ध्यान दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास आयुर्वेद शाखेचे विद्यार्थी हॉस्पिटलचे डॉक्टर्स महाविद्यालयातील शिक्षक तसेच संस्थेतील शिक्षक वृंद उपस्थित होते.