*नंदुरबार तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे देवरे विद्यालयात पारितोषिक वितरण संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे देवरे विद्यालयात पारितोषिक वितरण संपन्न*
*नंदुरबार तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे देवरे विद्यालयात पारितोषिक वितरण संपन्न*
नंदूरबार(प्रतिनीधी):-नंदुरबार तालुक्यातील धंगाई विधायक कार्य मंडळाचे आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे शिक्षण विभाग पंचायत समिती नंदुरबार नंदुरबार तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 45 वे तालुकास्तरीय विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शन संपन्न झाले पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष, राजेंद्र आत्माराम देवरे सेवानिवृत्त विभागीय नियंत्रक रा.प.मं.धुळे नंदुरबार विभाग व अध्यक्ष धंगाई विधायक कार्य मंडळ, म्हसदी ता. साक्री जि.धुळे, प्रमुख अतिथी भावेश सोनवणे उपशिक्षणाधिकारी योजना जि.प. नंदुरबार प्रमुख व्याख्याते पी.झेड. कुवर, कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य विज्ञान व गणित अध्यापक मंडळ मुंबई, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील पंचायत समिती नंदुरबार, शिक्षण विस्तार अधिकारी एस.एन.पाटील, जयवंत चौरे, डॉ.एस.बी.गोसावी, पुष्पेंद्र रघुवंशी सचिव नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघ नंदुरबार यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. तत्पूर्वी पहिल्या सत्रात विज्ञान तंत्रज्ञानावर आधारित अभिनव प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले होते. त्यातूनही प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थ्यांचे विजेते गट विजेते ठरले. विज्ञान प्रदर्शन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर पी.झेड. कुवर यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थितांना विज्ञान प्रदर्शनाचे महत्त्व व वैज्ञानिक दृष्टिकोनातून आजच्या मानवाची प्रगती कशी आहे? व त्यात आपलाही खारीचा वाटा असावा यासाठी सर्वांनी सचित असावे असे आवाहन केले. सदर विज्ञान प्रदर्शनांमधून उच्च प्राथमिक गट एक इयत्ता पाचवी ते आठवी मधून उत्तेजनार्थ पारितोषिक शुभम डी निर्मल एस.जी. श्रॉफ हायस्कूल, नंदुरबार, तृतीय दीपेश लोहार रुपेश पाटील आ.ध. देवरे माध्यमिक विद्यालय विखरण, द्वितीय चैतन्य धनगर पी. जी.पाटील विद्यालय वैंदाने व प्रथम कृष्णा मराठी एकलव्य विद्यालय नंदुरबार, राखीव गटातून गौतम रवींद्र वळवी भाग्यचिंतन माध्यमिक विद्यालय नळवे तसेच माध्यमिक गट दोन इयत्ता नववी ते बारावी मधून उत्तेजनार्थ अक्षय गोकुळदास राठोड माध्यमिक विद्यालय उमरदे तृतीय मोक्षदा कोकणी डी.आर. हायस्कूल व ज्युनियर कॉलेज नंदुरबार द्वितीय यश गोपाल भोई समता विद्यालय धानोरा तर प्रथम क्रमांक अथर्व मिलींद वडनगरे एकलव्य विद्यालय नंदुरबार, राखीव गटामधून गिरीश जगदीश ठाकुर डी. आर.हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज नंदुरबार तसेच शिक्षकांसाठी अध्यापक शैक्षणिक साहित्य निर्मिती गट प्राथमिक उच्च प्राथमिक गट त्यात शिक्षकांमधून जयवंत भगवान पवार राजे शिवाजी विद्यालय नंदुरबार माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तर गट दोन मधून इयत्ता नववी ते बारावी शिक्षकांमधून दीपा दिनेश वाडेकर साधना विद्यालय शनिमांडळ तसेच प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर यांचे प्रायोगिक साधनांवरील उपकरण गटामधून शेख वसीम हरून अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा जोगणी पाडा हे पारितोषिकांचे मानकरी ठरले तसेच विशेष कौतुकास्पद बाब म्हणून जि.प. शाळा खामगाव येथील बाल वैज्ञानिक कु.मनीष बागुल यास विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रश्नमंजुषा कार्यक्रमातील विजेत्या विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात पारितोषिके वितरित करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आर.आर. बागुल व आभार एस एच गायकवाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नंदुरबार तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष, कपूरचंद मराठे, सचिव, फैयाज खान, मेळाव्याचे आयोजक देवरे विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. डी.साळुंके, नंदुरबार तालुक्यातील सर्व विस्तार अधिकारी, तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख,नंदुरबार तालुका मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी, विज्ञान शिक्षक संयोजन समितीतील सर्व शिक्षक तसेच विद्यालयातील विज्ञान शिक्षक सी. व्ही.नांद्रे, डी.बी. भारती,एम.डी. नेरकर, वाय.डी. बागुल, एम.एस. मराठे, एस.एच. गायकवाड, ए.एस. बेडसे, व्ही.बी. अहिरे, डी.बी. पाटील, एच.एम. खैरनार, एस जी. पाटील यांनी परिश्रम घेतले.