*पंतप्रधानांच्या हस्ते दिल्लीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन-खा.शरद पवार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पंतप्रधानांच्या हस्ते दिल्लीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन-खा.शरद पवार*
*पंतप्रधानांच्या हस्ते दिल्लीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन-खा.शरद पवार*
नवी दिल्ली(प्रतिनीधी):-दिल्लीत 21 ते 23 फेब्रुवारी 2025 दरम्यान होत असलेल्या 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता असल्याची माहिती माजी केंद्रीय मंत्री तथा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिली.71 वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या संमेलनाचे उद्घाटन तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संमेलनाचे निमंत्रण देण्यात आले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनाही निमंत्रण दिले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच भेट घेऊन त्यांना संमेलनाचे निमंत्रण देण्यात आले. पंतप्रधानांनी संमेलनाबाबत ज्या आस्थेने विचारपूस केली ती पाहता उद्घाटनाला ते उपस्थित राहतील, असे खा.शरद पवार म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी.
दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियमवर 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन‘ भरविण्यात येत आहे. या स्टेडियम परिसराला ‘छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी' असे नाव देण्यात आले आहे अशी माहिती सरहद्द संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी दिली. नांदेड येथून ग्रंथदिंडी. नानक साई फाऊंडेशनच्यावतीने नांदेड ते दिल्ली अशी 'संत नामदेव साहित्य दिंडी काढणार येणार आहे. या ग्रंथ दिंडी मध्ये महाराष्ट्र राज्यातील सुमारे 300 साहित्यिक व साहित्य प्रेमी सहभागी होतील अशी माहिती संजय नहार यांनी दिली. नानक साई फाऊंडेशनचे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. संत नामदेव महाराज यांची कर्मभूमी असलेल्या घुमान येथे 88 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. त्यावेळी पण पंढरीनाथ बोकारे यांच्या नेतत्वाखालील ग्रंथ दिंडी झाली होती. दिल्लीत पण त्यांची दिंडी महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास संमेलनाचे संयोजक नहार यांनी व्यक्त केला. ग्रंथ दिंडीत सहभागी होणे.
दिल्ली येथे होत असलेल्या साहित्य संमेलना ला इतीहासिक महत्व प्राप्त होणार असून जवळपास 1500 साहित्यिक व साहित्य प्रेमी दिल्ली त येतील असे गृहीत धरून नियोजन केले जात आहे. नांदेड येथून निघणारी ग्रंथ दिंडी 17 फेब्रुवारी ला रेल्वे मार्गाने जाणार असून 18 फेब्रुवारी रोजी आग्रा येथे पोहचेल. आग्रा येथून लुक्झरी बसणे आग्रा-मथुरा- वृंदावन या प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊन ग्रंथ दिंडी 20 फेब्रुवारी रोजी दिल्लीत दाखल होईल. 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान साहित्य संमेलन आणि दिल्ली दर्शन करून नांदेड साठी परतेल असे ग्रंथ दिंडीचे मुख्य संयोजक पंढरीनाथ बोकारे (9823260073) यांनी सांगितले. दिंडीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.