*फिरता नारळीय कार्यक्रम अंतर्गत,लोककल्याण बहुउद्देशीय संस्था, सिव्हिल ब्लड बँक, जनकल्याण ब्लड बँक,सेवा ब्लड बँक, नंदुरबार यांचा संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरात 135 दात्यांचे रक्तदान*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*फिरता नारळीय कार्यक्रम अंतर्गत,लोककल्याण बहुउद्देशीय संस्था, सिव्हिल ब्लड बँक, जनकल्याण ब्लड बँक,सेवा ब्लड बँक, नंदुरबार यांचा संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरात 135 दात्यांचे रक्तदान*
*फिरता नारळीय कार्यक्रम अंतर्गत,लोककल्याण बहुउद्देशीय संस्था, सिव्हिल ब्लड बँक, जनकल्याण ब्लड बँक,सेवा ब्लड बँक, नंदुरबार यांचा संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरात 135 दात्यांचे रक्तदान*
नंदुरबार(प्रतिनीधी):-श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पदयात्रा सोहळा व महन्महनिय कृष्णाजी गुरुमाऊली यांच्या आशीर्वादाने फिरता नारळीय कार्यक्रम अंतर्गत, लोककल्याण बहुउद्देशीय संस्था, सिव्हिल ब्लड बँक, जनकल्याण ब्लड बँक, सेवा ब्लड बँक, नंदुरबार यांचा संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरात 135 दात्यांचे रक्तदान. नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेत मदतीचा हात म्हणून या भव्य दिव्य पावनमय सोहळ्यात समस्त ग्रामस्थ व ह.भ.प माऊली भजनी मंडळ, नंदुरबार, लोककल्याण बहुउद्देशीय संस्था नंदुरबार, राष्ट्रीय सेवा योजना विभाग जी.टी पाटील महाविद्यालय, नंदुरबार यांचा विशेष मदतीने तसेच लोककल्याण संस्थेचे अध्यक्ष पंकज ठाकरे, संस्थेचे सचिव राकेश चौधरी, संदीप चौधरी, रामकृष्ण धनगर, डॉ.खुशाल राजपूत, विजय माळवे, हिरालाल बारी, पंकज मंडलिक, किशोर महाले, दिपक साळी, पवन मराठे, कुणाल चौधरी, हेमंत माळी, जयेश सोनवणे, गणेश शिरसाठ, जी.टी पाटील महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा.दिनेश देवरे, प्रा.सुलतान पवार, प्रा. जितू पाटील व स्वयंसेवक, वारकरी, कीर्तनकार संप्रदाय आदींचे सहकार्य लाभले. त्याच बरोबर जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीच्या डॉ.रमा वाडेकर व कर्मचारी, जनकल्याण रक्तपेढीचे डॉ. लालचंदाणी व कर्मचारी, सेवा ब्लड बँकेचे शुभम गव्हाणे व कर्मचारी यांनी रक्त संकलनासाठी विशेष सहकार्य केले तसेच लोककल्याण संस्थेने रक्तदात्यांचे आभार मानून समाज कार्यात अशाच प्रकारे सहभागाची अपेक्षा व्यक्त केली व शिबिराची सांगता झाली.