*राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी घेतली बिरसा फायटर्सच्या निवेदनाची दखल, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याच्या मागणीवर कार्यवाही*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी घेतली बिरसा फायटर्सच्या निवेदनाची दखल, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याच्या मागणीवर कार्यवाही*
*राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी घेतली बिरसा फायटर्सच्या निवेदनाची दखल,आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याच्या मागणीवर कार्यवाही*
शहादा(प्रतिनिधी):-ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घ्या, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून आयुक्त, भारतीय निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्याकडे 9 डिसेंबर 2024 रोजीच्या निवेदनाद्वारे करण्यात आली होती. मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी शहादा यांच्यामार्फत पाठविण्यात आले होते. त्या निवेदनाची दखल घेत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नंदूरबार यांनी उप सचिव तथा सहाय्यक मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी महाराष्ट्र राज्य मुंबई यांना पत्र दिले. त्या पत्रावर संजय गरूडकर सहाय्यक मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी कक्ष अधिकारी राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य मुंबई यांना पुढील कार्यवाहीसाठी निवेदन पाठवले आहे. ईव्हीएम हे एक मशीन असून ते हॅक करता येऊ शकते, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषदच्या निवडणूकीत मतदान हे ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात यावे. ईव्हीएम मशीन मध्ये गडबड करून बरेच उमेदवार हे निवडून येतात. असा आरोप मतदार करताना दिसतात. देशभरात ईव्हीएम मशीनविरोधात वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे जनतेत ईव्हीएम मशीन बाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्रात धक्कादायक निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीतील पक्षांकडून ईव्हीएम मशीन बाबत शंका उपस्थित करण्यात आली आहे. निवडलेले महायुतीचे उमेदवार हे मतदारांनी निवडून दिलेले नाहीत, तर ईव्हीएम मशीनमध्ये गडबड करून निवडून आले आहेत, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी मतदान केलेल्या व्यक्ती पक्षाच्या चिन्हा व्यतिरिक्त अन्य व्यक्तीच्या पक्षाच्या चिन्हास मतदान झाल्याचे आढळून आले आहे. सोलापूर जिल्ह्य़ातील मारकरवाडी येथील ग्रामस्थांनी आपले मत हे आपण दिलेल्या उमेदवाराला गेले नाही, असा आरोप करीत मतांची खात्री करण्यासाठी स्वतःच्या खर्चाने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यावर प्रशासनाने दबाव आणत बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया होऊ दिले नाही. त्यामुळे मतदारांमध्ये अधिकच संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. लोकांचा मशीन द्वारे मतदान करण्यावर अविश्वास निर्माण झाला आहे. म्हणून मतदारांचा संभ्रम दूर करण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका ह्या ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात यावी, अन्यथा ईव्हीएम मशीन विरोधात बिरसा फायटर्स संघटनेकडून देशभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला होता.