*जि प सदस्य़ मोहन शेवाळे यांनी केला शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जि प सदस्य़ मोहन शेवाळे यांनी केला शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश*
*जि प सदस्य़ मोहन शेवाळे यांनी केला शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जि प सदस्य़ मोहन शेवाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रविवारी घरवापसी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे, भरत गावित तसेच रतन पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा रविवारी पार पडला.
मदर टेरेसा स्कुलमध्ये पार पडलेल्या बैठकीत मोहन शेवाळे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेसची वाट धरली होती त्यामुळे त्यांनी महायुतीशी दुरावा ठेवत काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार केला होता. शेवाळे यांनी पक्ष प्रवेश करतांना सांगितले की, माझी विचारसरणी ही सर्वधर्म समभाव मानणारी आहे. शिव शाहू फूले आंबेडकरांच्या विचारधारेवर माझा विश्वास राहिला आहे. मागील काही महिन्यांपासून मी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून उमेदवारी मागत होतो परंतू माझा पुरता भ्रमनिरास झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खंबीर नेते अजीत पवार यांचे नेतृत्व़ मी कधीच अमान्य केले नव्हते. त्यांचे मार्गदर्शन माझ्यासारख्या असंख्य़ कार्यकर्त्यांना नेहमीच बळ देणारे ठरले आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश केला. माझी घरवापसी झाल्याने मी खुप आनंदात आहे. शहादा तालुक्यातील काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सेवादलाचे तालुका अध्यक्ष योगेश शिंदे, विठोबा ठाकरे, सखाराम पावरा, सुनिल पवार, दीपक पाटील, उपसरपंच सोमनाथ नावडे, मोहन शिंदे, सुरेश पावरा, नागेश पवार, नितेश पावरा,भरत जैन, रतिलाल पवार, सेवादल सदस्य़ शाम ढीवरे, भूलाणे येथील रविंद्र नगराळे, तुळसीराम सुळे, गणेश मोहिते, मुकेश पाटोळे, सुभाष बंजारा, नाना शिंदे, राजू निकम, जावदा उपसरपंच रामेश्व़र बिरारे, राजेश निकुंभ, विनोद पावरा, मंगल सुदाम रावताळे, योगेश सोनवणे, प्रकाशे येथील प्रफूल्ल़ सामुद्रे आदीं कार्यकर्त्यांनी भोंगरा गावाचे उपसरपंच तथा काँग्रेसचे राष्ट्रसेवा दलाचे जिल्हाअध्यक्ष प्रकाश पवार यांच्यासह प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस मधूकर पाटील यांनी यावेळी सुत्रसंचालन केले.
सुरेंद्र कुवर, छोटू कुवर, डॉ जितेंद्र भंडारी, डॉ नितीन पवार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.