*माळेगाव यात्रेला पारंपारिक देव सवारी पालखीने प्रारंभ,येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने परीसर दुमदुमला*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*माळेगाव यात्रेला पारंपारिक देव सवारी पालखीने प्रारंभ,येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने परीसर दुमदुमला*
*माळेगाव यात्रेला पारंपारिक देव सवारी पालखीने प्रारंभ,येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने परीसर दुमदुमला*
नांदेड(प्रतीनिधी):-दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेला काल दिनांक 29 रोजी खंडोबा देव सवारी आणि पालखीने प्रारंभ झाला असून येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात आणि बेल भंडारा खोबऱ्याची उधळण करीत लाखो भाविकांनी देवस्वारीचे दर्शन घेतले. खंडोबा यात्रेस पारंपरिक पद्धतीने सुरुवात झाल्यानंतर मुख्य रस्त्याने देव स्वारी निघाली देवसवारीचे विश्रामगृह समोर आगमन झाले यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कंधार लोहा मतदार संघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार आनंदराव बोंढारकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, भाजपा नेते श्रावण भिलवंडे यांनी पालखीचे दर्शन घेतले. यावेळी पालखी सोहळ्यात पारंपारिक वेशभूषा परिधान केलेले वाघ्या मुरळी वासुदेव कवड्याच्या माळी लांब हळदीचा मळवट भरून हातापायावर चाबकाचे फटके मारत सहभागी झाले होते त्यांना पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. सदरील यात्रा 5 जानेवारीपर्यंत सुरू राहणार असून या यात्रेतील शासकीय कार्यक्रम राष्ट्रीय दुखवट्यामुळे पुढे ढकलण्यात आले आहेत 2 जानेवारी पासून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे देशभरातील भाविक पुढील काळात येणार असून पशुधनाचा मोठा बाजार या कालावधीत सुरू होतो. या यात्रेला कुलदैवताची यात्रा समजणाऱ्या अनेक जमातीचे नागरिक आज पासून पारंपारिक पेहेरावात दाखल झाले आहेत.