*कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा राजापूरच्या वतीने सन 2025 सालाच्या दिनदर्शिका प्रकाशन वितरण सोहळा उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा राजापूरच्या वतीने सन 2025 सालाच्या दिनदर्शिका प्रकाशन वितरण सोहळा उत्साहात संपन्न*
*कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा राजापूरच्या वतीने सन 2025 सालाच्या दिनदर्शिका प्रकाशन वितरण सोहळा उत्साहात संपन्न*
मुंबई(प्रतिनीधी):-राजापूर शाखेच्या वतीने शुक्रवार 20 रोजी दिनदर्शिका वितरण सोहळा व इतर महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी संघ मुख्य कार्यालय ज्ञाती हॉल परळ मुंबई येथे शाखा अध्यक्ष शिवाजी तेरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिनदर्शिकेचे प्रकाशन कुणबी समाजोन्नती संघांचे सरचिटणीस कृष्णाजी वणे यांच्या शुभहस्ते शाखेचे अध्यक्ष शिवाजी तेरवणकर, संघांचे माजी सरचिटणीस अरविंद डाफले, राजापूर सन्मित्र सह पत संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर रायकर, उपाध्यक्षा सौं मीनाक्षी डोंगरकर, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ऍड अवधूत तोरस्कर, सचिव प्रभाकर वारिक, खजिनदार सोनू ठुकरूल, शाखा उपाध्यक्ष चंद्रकांत सोगम, संजय वारिक, सहसचिव जयवंत नाचणेकर, संतोष जोगळे, कुणबी युवाध्यक्ष वैभव वालम, सचिव मनोहर नाडणकर तसेच पत संस्थेचे संचालक, शाखा कार्यकारिणी सदस्य, युवक मंडळ पदाधिकारी, समाज बांधव व जाहिरात दार यांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.
सदर सभेत संघ संस्थापक कै. माळी गुरुजी यांच्या कशेळी येथील स्मृतीस्थळी ब्रॉन्ज धातूच्या अर्ध पुतळा बसविण्याबाब चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात आला. याकरता किमान 4 ते 5 लाखाचा निधी समाज बांधवांमार्फत उभा करण्यासाठी विनम्र आवाहन करण्यात आले, याला सभागृहातून उत्तम प्रतिसाद मिळाला यावेळी कुणबी युवक मंडळ राजापूरच्या वतीने कै. माळी गुरुजींच्या नावाने प्रतीवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या माळी गुरुजी चषक टूर्नामेंट मार्फत उभा केलेल्या निधीतून माळी गुरुजींच्या अर्ध पुतळ्याकरता रू. 11000 एवढ्या देणगीची रक्कम राजापूर शाखा अध्यक्ष शिवाजी तेरवणकर यांजकडे सुपूर्द केली. यावेळी शाखेच्या वतीने त्यांचे कौतुक करण्यात आले. उपस्थित समाज बांधव अवधूत तोरस्कर, लक्ष्मण मणचेकर, सोनू ठुकरुल यांनी आपली देणगी जाहीर केली. तसेच कार्यकर्त्यानी विभागवार देणाग्या जमा करण्याचे आवाहन शाखेच्यावतीने करण्यात आले.1 व 2 फेब्रुवारी 2025 रोजी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा राजापूर, कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ तसेच राजापूर सन्मित्र सह पत पेढी व युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यकर्त्यांचे मंथन शिबीर, विसावा रिसॉर्ट, केळवा बीच येथे आयोजित करण्यात आले असून याकरता नियोजन समिती स्थापन करण्यात आली असून कार्यकर्त्यानी आपली नावे यासमितीकडे लवकरच नोंद करावीत असे सूचित करण्यात आले. सदर शिबिरात मुंबई व ग्रामीण कार्यकर्त्यानी आवर्जून सहभागी व्ह्यावे असे अध्यक्ष तेरवणकर यांनी आवाहन केले.