*नंदुरबार तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे 19 डिसेंबर व 20 डिसेंबर रोजी आ. ध. देवरे माध्यमिक विद्यालय,विखरण येथे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे 19 डिसेंबर व 20 डिसेंबर रोजी आ. ध. देवरे माध्यमिक विद्यालय,विखरण येथे आयोजन*
*नंदुरबार तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे 19 डिसेंबर व 20 डिसेंबर रोजी आ. ध. देवरे माध्यमिक विद्यालय,विखरण येथे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनीधी):-नंदुरबार तालुका स्तरीय 45 वे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन 19 व 20 डिसेंबर 2024 रोजी आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे आयोजित करण्यात आले आहे. विज्ञान प्रदर्शनात सादरीकरणासाठी शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान (Science and technology for sustainable future)असा विषय निश्चित करण्यात आला असून सामाजिक व पर्यावरण पुरक, आजच्या काळाची गरज ओळखून मुख्य विषयाला अनुसरून पुढीलप्रमाणे सात विषय निर्धारित करण्यात आले आहेत. त्यात अन्न,आरोग्य आणि स्वच्छता (Food, Health & Hygiene), वाहतूक व दळणवळण (Transport & Communication), नैसर्गिक शेती (Natural Farming), आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management), गणितीय मॉडेलिंग आणि संगणकीय विचार (Mathematical modelling and Computational thinking), कचरा व्यवस्थापन(Waste Management), संसाधन व्यवस्थापन(Resource Management), या विषयांवर गटानुसार अ) गट विद्यार्थ्यांसाठी गट1 इ. 6 वी ते इ. 8 वी उच्च प्राथमिक स्तर गट 2 इ. 9 वी ते इ. 12 वी माध्य व उच्च माध्यमिक स्तर गट ब) शिक्षकांसाठी अध्यापक शैक्षणिक साहित्य निर्मिती गट 1) उच्च प्राथमिक स्तर 2) माध्य. उच्च माध्यमिक स्तर
गट क) माध्यमिक शाळेतील प्रयोगशाळा सहाय्यक/परिचर यांचे प्रायोगिक साधनांवरील उपकरण गट विषय गणित व विज्ञान ड) प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी शैक्षणिक साहित्य निर्मिती गट या स्वरूपात विभागणी करण्यात आली असून सर्व शाळांनी सक्तीने सहभाग नोंदवावा असे आवाहन नंदुरबार पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी निलेश पाटील, अध्यक्ष, नंदुरबार तालुका मुख्याध्यापक संघ, आयोजक
मुख्याध्यापक आ.ध.देवरे माध्यमिक विद्यालय विखरण यांनी केले आहे. तरी नंदुरबार तालुक्यातील सर्व आस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांनी आपला सहभाग नोंदवण्याचे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात येत आहे.