*कळसवली ग्रंथालय आणि कोमसाप यांच्या वतीने कथाकथन स्पर्धेचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कळसवली ग्रंथालय आणि कोमसाप यांच्या वतीने कथाकथन स्पर्धेचे आयोजन*
*कळसवली ग्रंथालय आणि कोमसाप यांच्या वतीने कथाकथन स्पर्धेचे आयोजन*
राजापूर(प्रतिनीधी):-साने गुरुजी ग्रंथालय कळसवली आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखा राजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पू.साने गुरुजींच्या 125 व्या जयंतीनिमित्ताने लांजा, राजापूर तालुका मर्यादित शाळांतील विद्यार्थ्यांसाठी कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे सदर स्पर्धा दोन गटात दि. 20 डिसेंबर 2024 रोजी श्रीमती उमाताई शरद परुळकर माध्यमिक विद्यालय वडवली येथे सकाळी 10 वाजता सुरू होणार आहेत
स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावी या दोन गटात होतील कथा मराठीत व बोधपर असावी लहान गट तीन ते पाच मिनिटे व मोठा गट पाच ते सात मिनिटे अशी वेळ ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेतील मोठ्या गटातील विजेत्या प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे 1501, 1001 व 701 अशी रोख बक्षीसे व प्रत्येकी एक पुस्तक देण्यात येईल तर लहान गट प्रथम क्रमांक 1001 रु रोख, द्वितीय 701 व तृतीय 501 रु रोख व प्रत्येकी एक पुस्तक भेट देण्यात येईल सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येईल स्पर्धेत सहभाग नोंदविण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर पर्यंत असून दोन्ही तालुक्यातील जास्तीत जास्त शाळांनी शरद साखळकर - ८८५५८३६८४३, वैभव ठाकूरदेसाई - ७९७२६५१३१० यांच्याशी संपर्क साधून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.