*करिअर मार्गदर्शन शिबिर नियोजनासाठी जिजाऊ संस्थेचे आवाहन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*करिअर मार्गदर्शन शिबिर नियोजनासाठी जिजाऊ संस्थेचे आवाहन*
*करिअर मार्गदर्शन शिबिर नियोजनासाठी जिजाऊ संस्थेचे आवाहन*
रत्नागिरी(प्रतिनीधी):-जिजाऊ सामजिक व शैक्षणिक संस्था महाराष्ट्र गेली 15 वर्षांपासून शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेती या विषयावर तसेच अनेक सामाजिक विषयावर ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिह्यातील विशेष काम करत आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या संकल्पनेतून हे सर्व काम कोकणातील 5 जिल्ह्यात सुरू आहे. गेले वर्षभर रत्नागिरी मध्ये संस्थेचे काम जोमाने सुरू आहे.
पुढील 10 वर्षात रत्नागिरी जिल्यातील प्रत्येक गावात किमान एक तरी अधिकारी झालाच पाहिजे हे जिजाऊंचे उद्दिष्ट आहे. इथली मुले ही अत्यंत हुशार आहेत त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळत नाही किंवा तसा प्रयत्नही आजवर कुणी केला नाही. उपरोक्त उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लवकरच जिजाऊ गावोगावी जाऊन करियर मार्गदर्शन आणि वही वाटप कार्यक्रमाला सुरवात करणार आहे संस्थेच्या वतीने संदीप पाटील सर मार्गदर्शन करण्यासाठी गावोगावी सोबत जातात त्यासाठी गावकरी व मुले यांनी वेळेचे योग्य नियोजन करून कार्यक्रमाची आखणी करणे आवश्यक आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आपल्या गावात किंवा वाडीमध्ये जर मार्गदर्शन शिबीर घ्यायचे असेल तर त्याच्या नियोजनसाठी
तालुका अध्यक्ष
मंदारजी नैकर :8554853999
युवक तालुकाध्यक्ष
अक्षय बारगुडे :9623574395
लांजासाठी संस्थेचे सचिव केदार चव्हाण :7208612222
लांजा तालुकाध्यक्ष
योगेश पांचाळ :8999663079
राजापूरसाठी
जयेश जोशी: 8446323500
यांना संपर्क साधावा असे आवाहन जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड महेंद्र वसंत मांडवकर यांनी केले आहे.