*भारतीय आदिम जाती सेवक संघ नवी दिल्ली या राष्ट्रीय संस्थेला 75 वर्ष पूर्ण, प्लॅटिनम जुबली समारंभाचा भव्य कार्यक्रम नवी दिल्ली येथे संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*भारतीय आदिम जाती सेवक संघ नवी दिल्ली या राष्ट्रीय संस्थेला 75 वर्ष पूर्ण, प्लॅटिनम जुबली समारंभाचा भव्य कार्यक्रम नवी दिल्ली येथे संपन्न*
*भारतीय आदिम जाती सेवक संघ नवी दिल्ली या राष्ट्रीय संस्थेला 75 वर्ष पूर्ण, प्लॅटिनम जुबली समारंभाचा भव्य कार्यक्रम नवी दिल्ली येथे संपन्न*
नंदूरबार(प्रतिनीधी):-भारतीय आदिम जाती सेवक संघ नवी दिल्ली या राष्ट्रीय संस्थेला 75 वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने प्लॅटिनम जुबली समारंभाचा भव्य कार्यक्रम नवी दिल्ली येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला भारताच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्म या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या, या कार्यक्रमाला नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील आदिवासी समाजासाठी कार्यरत असलेली संस्था आदर्श भरत रूपा वसावे एज्युकेशन सोसायटी मोलगी या संस्थेचे अध्यक्ष भरत रूपा वसावे आहेत तसेच भारतीय आदीम जाती सेवक संघ नवी दिल्ली या राष्ट्रीय संस्थेचे ते कार्यकारणी सदस्य तसेच आजीवन सदस्य आहेत सन 1971 पासून ते या संस्थेमध्ये सामाजिक कार्य करत आहेत. आदर्श भरत रूपा वसावे एज्युकेशन सोसायटी मोलगी या संस्थेचे उपाध्यक्ष कु. शितल भरत वसावे यांना ही या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले होते संस्थेचे सचिव अशोक रामजी वरठा रा. धुंदलवाडी ता.डहाणू जि. पालघर यांनी स्वतः तयार केलेली वारली आदिवासी चित्रकला (पेंटिंग) भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्म यांना भेट देण्यासाठी त्यांची निवड झाली ते वारली चित्रकलेमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत त्यांच्या चित्रकलेचं प्रदर्शन झालेले आहे, आज माझ्यासाठी सर्वात मोठी अभिमानाची गोष्ट आहे असे ते सांगतात. 75 व्या प्लॅटिनम जुबली समारंभाच्या कार्यक्रमाच्या वेळी महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्म यांनी आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या प्रतिनिधींना शुभेच्छा देऊन त्यांच्या आत्मविश्वास द्विगुणित केला आदिवासी समाजासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले 75 व्या प्लेटिनम समारंभाच्या भव्य प्रसंगी भारतीय आदिम जाती सेवक संघाचे अध्यक्ष तसेच पूर्व राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद पूर्व प्रधानमंत्री मोरारजी देसाई गुजरातचे पूर्व मुख्यमंत्री यु. एन. ढेभर आणि भारतीय आदिम जाती सेवक संघाचे संस्थापक ठक्कर बाप्पा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्म यांनी कौतुक केले, याप्रसंगी आपल्या जीवन कार्याबद्दल बोलताना श्रीमती मूर्म यांनी आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये भारतीय आदिम जाती सेवक संघाच्या वस्तीगृहा मध्ये राहून शिक्षण पूर्ण केले आहे व आज पूर्ण भारताचे नेतृत्व करण्याचे सौभाग्य मला मिळाले हे माझ्यासाठी व माझ्या समाजासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे, असे त्या म्हणाल्या या कार्यक्रमाच्या वेळी फगनसिंग कुलसते लोकसभा सांसद तसेच चेअरमन संसदीय समिती आणि अनुसूचित जाती आणि जमाती कल्याण रुद्रपा लंबानी उपसभापती विधानसभा कर्नाटक भारतीय आदिम जाती सेवक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नयन चंद्र हेमराम जनरल सेक्रेटरी अजय कुमार चौबे तसेच 22 राज्यांमधून 115 आदिवासी समाजाचे प्रतिनिधी तसेच संघठनांना आमंत्रित करण्यात आले होते या शुभप्रसंगी विविध राज्यातून आलेले आदिवासी कलाकारांनी आपल्या संस्कृतीचे तसेच सांस्कृतीक कार्यक्रमाचं प्रदर्शन घडवून सर्वांना मंत्रमुग्ध केले व कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न झाला.