*500 रूपयांचा स्टॅम्प घेण्याच्या निर्णयाला बिरसा फायटर्सचा विरोध*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*500 रूपयांचा स्टॅम्प घेण्याच्या निर्णयाला बिरसा फायटर्सचा विरोध*
*500 रूपयांचा स्टॅम्प घेण्याच्या निर्णयाला बिरसा फायटर्सचा विरोध*
धडगांव(प्रतिनिधी):-स्टॅम्प ड्युटीसाठी 108 रूपये ऐवजी 500 रूपये घेण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, या मागणीचे निवेदन तहसीलदार धडगांव मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आले आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,नाशिक विभागीय अध्यक्ष विजय पावरा, तालुकाध्यक्ष सुनिल पावरा, तालुका सचिव मुकेश पावरा, तुषार पावरा व अन्य बिरसा फायटर्स कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाने 30 सप्टेंबर 2024 रोजी निवडक मालमत्ता व्यवहारांसाठी मुद्रांक शुल्क दरांमध्ये सुधारणा जाहीर केली. कामाचे कंत्राट, भूखंडाचे एकत्रीकरण, पुनर्रचना, विभागणी आणि विलीनीकरणासाठी आवश्यक असणा-या कागदपत्रांच्या नोंदणी आता 100 रूपयांत केली जाणार नाही. तर आता मुद्रांक शुल्क 100 वरून 500 रूपये करण्यात आला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण योजनेवर सुद्धा आता 100 चे मुद्रांक शुल्क 500 रूपये आकारले जात आहेत. यामुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक होत आहे. गरीब व सर्व सामान्य जनतेला कोणत्याही दस्तावेजाच्या नोंदणीसाठी 500 रूपये देणे परवडत नाही. एखादे प्रतिज्ञापत्र लिहून द्यायचे असेल तरी लिहून देणाराही म्हणजेच रायटर 200 ते 250 रूपये घेतो. म्हणजेच मुद्रांक शुल्क 500 रूपये व लिहून देणा-याचे 250 रूपये अशे एकूण 750 रूपये साध्या दस्तावेज नोंदीसाठी द्यावे लागतात, ही एक प्रकारची सर्व सामान्य जनतेची लूटमार सुरू झाली आहे. सरकार लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना सारखे अनेक फुकट्या योजना राबवून पाण्यासारखे पैसे वाटत आहे व दुसरीकडून 100, रूपयांचे मुद्रांक शुल्क 500 रूपये वाढवून सर्व सामान्य जनतेकडून पैसे वसूल करीत आहेत. यामुळे सर्व सामान्य जनता त्रस्त झाली आहे. सरकारच्या या निर्णयाचा आम्ही जाहीर पणे विरोध करतो. सर्व सामान्य जनतेला कंगाल करणारा हा सरकारचा निर्णय आहे. म्हणून स्टॅम्प ड्युटीसाठी 100 रूपये ऐवजी 500 रूपये घेण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा. अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आलेला आहे.