*एकलव्य महाविद्यालयाचा विद्यार्थी राहुल वसावे राज्यावर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*एकलव्य महाविद्यालयाचा विद्यार्थी राहुल वसावे राज्यावर*
* एकलव्य महाविद्यालयाचा विद्यार्थी राहुल वसावे राज्यावर*
नंदुरबार(प्रतिनीधी):-येथील एकलव्य विद्यालय आणि जयंतराव गणपत नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाचा जलद धावपटू राहुल वसावे याने नुकत्याच नाशिक येथे संपन्न झालेल्या शालेय विभागीय मैदानी स्पर्धेत 19 वर्षातील गटातून 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करत सुवर्ण पदक पटकावले.
राहुलसोबत नाशिक मनपा, नाशिक जिल्हा ग्रामीण, जळगाव मनपा, जळगांव जिल्हा ग्रामीण, धुळे मनपा, धुळे जिल्हा ग्रामीण, मालेगाव मनपाचे खेळाडू सोबत होते. या सर्व खेळाडूंना मागे टाकत प्रथम क्रमांक मिळविला.
त्याचबरोबर महाविद्यालयाचा 400 मीटर रीलेच्या संघाचे सुद्धा उत्तम कामगिरी करत द्वितीय क्रमांक प्राप्त करत सिल्वर पदक प्राप्त केले. सदर रिलेच्या संघात राहुल वसावे, क्रिश्णा चौधरी, अब्बास तडवी आणि माधव वळवी यांचा समावेश होता.
पुढील महिन्यात पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत नाशिक विभाग व महविद्यालयाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. सर्व खेळाडूंचे महाविद्यालयाच्या प्राचार्या सुहासिनी सुहास नटावदकर, उपप्राचार्य शैलजा कापडिया, पर्यवेक्षक शंकर सोनार आदींनी सत्कार व अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.