*महिला महाविद्यालयात 'मी मतदान करणारच' मोहीम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*महिला महाविद्यालयात 'मी मतदान करणारच' मोहीम*
*महिला महाविद्यालयात 'मी मतदान करणारच' मोहीम*
शहादा(प्रतिनीधी):- येथील कला व विज्ञान महिला महाविद्यालयात मतदान जनजागृती संदर्भात 'मी मतदान करणारच' मोहीम राबविण्यात आली. सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला व विज्ञान महिला महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग, निवडणूक साक्षरता मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास एकतातर्फे विधानसभा निवडणूक जनजागृती अभियाना अंतर्गत 'मी मतदान करणारच' या विषयावर प्रतिज्ञा, स्वाक्षरी मोहिम व सेल्फी पॉईंटचे उद्घाटन प्राचार्य डॉ. व्ही. एस. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राज्यशास्त्र विभाग प्रमुख, निवडणूक साक्षरता मंडळाचे प्रमुख व रा.से.यो.चे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अनिल साळुंके, क्रीडा संचालक प्रा. डॉ. भारत चाळसे, ग्रंथपाल प्रा. डॉ. प्रसन्ना डांगे, सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेविका उपस्थित होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. व्ही. एस. पाटील यांनी, मतदार हा लोकशाहीतील खरा राजा असून महाविद्यालयातील मतदानास पात्र असणाऱ्या विद्यार्थिनींनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत स्वतः मतदानाचे पवित्र कर्तव्य निभावून आपल्या पालकांसह नागरिकांना मतदान करण्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रा. डॉ. अनिल साळुंके यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. भारत चाळसे, प्रा. डॉ. प्रसन्ना डांगे, राजेश राठोड, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेविकांनी परिश्रम घेतले.