*अक्कलकुवा विधानसभा मतदार संघ महायुतीच्या वाट्याला नेमक्या कोणत्या पक्षाला सुटणार याबाबत कमालीची उत्सुकता*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अक्कलकुवा विधानसभा मतदार संघ महायुतीच्या वाट्याला नेमक्या कोणत्या पक्षाला सुटणार याबाबत कमालीची उत्सुकता*
*अक्कलकुवा विधानसभा मतदार संघ महायुतीच्या वाट्याला नेमक्या कोणत्या पक्षाला सुटणार याबाबत कमालीची उत्सुकता*
अक्कलकुवा(प्रतिनीधी):-राज्यातील पहिल्या क्रमांकाचा अक्कलकुवा विधानसभा मतदार संघ महायुतीच्या वाट्याला नेमक्या कोणत्या पक्षाला सुटणार याबाबत कमालीची उत्सुकता असून सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे.
अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या मतदारसंघ असून या अक्कलकुवा व अकरानी या दोन तालुक्यांच्या असलेल्या या मतदार मतदारसंघावर काँग्रेसचे एड. के सी पाडवी हे गेल्या 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मतमोजणीच्या शेवटच्या फेरीत निसटता विजय मिळवला होता हा मतदारसंघ 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा शिवसेना महायुतीत शिवसेना पक्षाला सुटल्याने विद्यमान विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी भाजपा व शिवसेना पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रामाणिक मेहनतीने चुरशीची लढत दिली होती 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत या मतदारसंघावर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी प्रस्थापितांसह विरोधकांनी देखील व्युहरचना रचत प्रतिष्ठा पणाला लावली आहे, नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दिनांक उजाडूनही हा मतदारसंघ महायुतीत नेमका कोणाच्या वाट्याला जाणार याबाबत उत्सुकता अगदीच शिगेला पोहोचली असल्याने महायुतीतील सर्वच मित्र पक्ष ऑक्सीजन वर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे, या मतदारसंघावर मतदार संघाच्या बाहेरील उमेदवार उमेदवारीची तयारी करीत असल्याचेही वृत्त झळकत असल्याने उत्सुकता अधिकच शिगेला पोहोचली आहे, मतदार संघातील शिवसेना शिंदे गटातील दोन गटांमध्ये अंतर्गत वादामुळे कमालीच्या दुरावा निर्माण झाला असल्याने, हा वाद शमविण्यासाठी ही जागा भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला गेल्यास स्थानिक इच्छुक उमेदवार नागेश दिलवरसिंग पाडवी यांच्याकडे गेल्यास या वादावर पडदा पडण्याची शक्यता, शिवसेना शिंदे गटाच्या एका गटाकडून व्यक्त केली जात असून, शिवसेना शिंदे गटाकडून आमदार आमशा पाडवी यांचे सुपुत्र जिल्हा परिषद सभापती शंकर पाडवी हे इच्छुक असून याच विधानसभा मतदारसंघातून संपर्कप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह पराडके हे देखील इच्छुक असल्याचे बोलले जात आहे, या मतदारसंघातील स्थानिक उमेदवाराला उमेदवारी देण्यात यावी अशीही वरिष्ठांकडे मागणी होत असल्याने पक्षश्रेष्ठी यातून कोणता मार्ग काढतात व कोणाला उमेदवारी जाहीर करतात? ही तारेवरची कसरत आहे अन्यथा या मतदार संघात बंडखोरी होण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.