*जामिया औद्योगिक प्रशिक्षण संस्था (I. T. I) अक्कलकुवा येथे पारितोषिक वितरण समारंभ संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जामिया औद्योगिक प्रशिक्षण संस्था (I. T. I) अक्कलकुवा येथे पारितोषिक वितरण समारंभ संपन्न*
*जामिया औद्योगिक प्रशिक्षण संस्था (I. T. I) अक्कलकुवा येथे पारितोषिक वितरण समारंभ संपन्न*
नंदुरबार(प्रतिनीधी):-22 ऑक्टोबर रोजी झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात विविध ट्रेड मधून ह्या वर्षी प्रथम व्दितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या व संस्थेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष मौलाना हुझैफा वस्तांनवी व प्रस्तावित जि.एम वस्तांनवी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सय्यद अकील, व पॅरामेडिकल सायन्स कॉलेजच्या पुर्व प्राचार्या डॉक्टर सय्यद आयेशा ह्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले, यावेळी प्राचार्य अकबर पटेल यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना, उत्तीर्ण विद्यार्थ्याचे अभिनंदन केले व नविन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत केले, तसेच संस्थेची एकतीस वर्षांच्या कार्यकाळात संस्थेची यशस्वीता व विद्यार्थ्यांच्या रोजगानिर्मिती बाबत आपले मनोगत व्यक्त केले, यावेळी पुर्व प्राचार्या डॉक्टर आयेशा सैय्यद ह्यांनी फैशन डिझायनिंगच्या विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले. तसेच कुलगुरू डॉक्टर सैय्यद अकील यांनी विद्यार्थ्यांना रोजगार प्रशिक्षण भिमुख योजना ह्यावर मार्गदर्शन केले. अध्यक्षांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना चरित्र व बंधुत्व ह्यावर मार्गदर्शन करतांना सांगितले की, कोणत्याही देशाची प्रगती बंधुभाव आणि इमानदारीवर अवलंबून आहे म्हणून तुम्ही कुठेही व कोणतेही कार्य करा ह्या दोन गोष्टी तुमच्या अंगी असणे आवश्यक आहे.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना जामियाचे संस्थापक मौलाना गुलाम वस्तानवी यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास जामिया शैक्षणिक संकुलनातील सर्व प्राचार्य तसेच जामिया आय. टि. आयचे प्राचार्य अकबर पटेल, उप प्राचार्य इलियास पटेल व शिक्षक आदी उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कारा हनिफ, आभार उप प्राचार्य इलियास पटेल यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.