*पक्ष मजबुतीसाठी लढायचे, प्रकाशा मंडळातील भाजपा बैठकीत डॉ. विजयकुमार गावित यांचे मार्गदर्शन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पक्ष मजबुतीसाठी लढायचे, प्रकाशा मंडळातील भाजपा बैठकीत डॉ. विजयकुमार गावित यांचे मार्गदर्शन*
*पक्ष मजबुतीसाठी लढायचे, प्रकाशा मंडळातील भाजपा बैठकीत डॉ. विजयकुमार गावित यांचे मार्गदर्शन*
नंदुरबार(प्रतिनीधी):-कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवून आपण जास्तीत जास्त चांगलं काम करून दाखवले. म्हणूनच पक्ष संघटन मजबूत करायचे आहे पक्ष वाढवायचा आहे या दृष्टिकोनातून पक्षाने आपल्याला पुन्हा संधी दिली आहे त्याचं सोनं करत असताना पक्षाने केलेले कार्य सांगण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेले पाहिजे आणि पक्ष मजबूत कसा होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे, पक्षाचा विजय तोच आपला विजय हे मानून काम केले पाहिजे; अशा शब्दात नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ.विजयकुमार गावित यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 21 ऑक्टोबर 2024 रोजी डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशा मंडळातील कार्यकर्त्यांची बैठक शहादा येथे पार पडली. त्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी वेगवेगळ्या पक्षातील गावातील कार्यकर्त्यांनी डॉ.विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वात सामूहिकपणे भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
भाजपा जेष्ठ नेते बापूसाहेब दिपक पाटिल, डॉ. कांतीलाल टाटीया, माजी प.स. सभापती विरसिंग ठाकरे, जि.प.सदस्य के.डी.नाईक, प्रकाशा मंडळाध्यक्ष विजय पाटिल, वकील पाटिल, ईश्वर भुता पाटिल, रवी रावल, सुनील पाटिल, कृष्णा कोळी यांच्यासह परिसरातील सरपंच, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महायुती सरकारच्या माध्यमातून भाजपा आणि मित्रपक्षांनी सामान्य नागरिकाला न्याय देण्यासाठी जे काम केले ते लोकांपर्यंत पोहोचवा. लाडकी बहीण योजना, पिक विमा योजना, बचत गटातील महिलांना दिलेले गृहउद्योग, गाय वाटप, घरकुल, रस्ते विकास, पाणी योजना अशा विविध स्वरूपात प्रत्येक गावाच्या विकासासाठी दिलेला निधी, राबवलेल्या योजना आणि त्या माध्यमातून केलेली विकासकामे याविषयीची माहिती आपापल्या गावातील ग्रामस्थांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन याप्रसंगी केलेल्या मार्गदर्शनातून करण्यात आले.