*जीटीपी महाविद्यालयात आंतरविभागीय हॉकी स्पर्धा संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जीटीपी महाविद्यालयात आंतरविभागीय हॉकी स्पर्धा संपन्न*
*जीटीपी महाविद्यालयात आंतरविभागीय हॉकी स्पर्धा संपन्न* नंदुरबार(प्रतिनीधी):-येथील जी.टी.पाटील महाविद्यालयात क. ब. चौ. उ. म. विद्यापीठ, जळगाव अंतर्गत आंतर विभागीय हॉकी पुरुष आणि महिला स्पर्धा संपन्न झाल्या. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. एम.जे. रघुवंशी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगत सांगितले की विद्यापीठाच्या परीक्षा सुरू असताना देखील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग ही बाब कौतुकास्पद आहे. यावरून असे लक्षात येते की, खेळाडू अभ्यासाच्या माध्यमातून बौद्धिक गुणवत्ते कडे लक्ष देतात तसेच क्रीडा गुणवत्तेकडे गंभीरतेने लक्ष देतात. प्रसंगी व्यासपीठावर विद्यापीठ संघाचे निवड समिती सदस्य डॉ. चांद खान डॉ. अनिता कोल्हे डॉ. हसीन तडवी, नंदुरबार विभाग संघ व्यवस्थापक प्रा. विनीश चंद्रन, एरंडोल विभाग संघ व्यवस्थापक प्रा. जे. बी. सिसोदिया संघ प्रशिक्षक डॉ. व्ही. के. पाटील धुळे विभाग संघ व्यवस्थापक प्रा. मोहसीन शेख आदी उपस्थित होते. या स्पर्धेत जळगाव, नंदुरबार, धुळे आणि एरंडोल अशा चार संघांचा सहभाग होता. स्पर्धेतील सामने साखळी पद्धतीने खेळवले गेले. स्पर्धेत पंच म्हणून सुनील पवार, कुणाल भाट, प्रकाश मिस्त्री आणि आकाश वाडीले यांनी काम पाहिले. या स्पर्धेतून विद्यापीठाच्या संघाची निवड करण्यात आली. पुरुष गटात एरंडोलचा संघ तर महिला गटात जळगावचा संघ विजयी झाला. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. टी. एल. दास यांनी स्पर्धेचे आयोजक सचिव म्हणून कार्यभार सांभाळला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिमखाना समिती सदस्य डॉ. एफ. आर. खांडेकर आणि प्रा. जितेंद्र पाटील यांचे सहकार्य लाभले.