*बागवेवाडी मुख्य रस्त्याच्या भूमिपूजन सोहळ्याला 13 रोजी बांधकाम मंत्र्यांसह मान्यवरांच्या उपस्थिती*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बागवेवाडी मुख्य रस्त्याच्या भूमिपूजन सोहळ्याला 13 रोजी बांधकाम मंत्र्यांसह मान्यवरांच्या उपस्थिती*
*बागवेवाडी मुख्य रस्त्याच्या भूमिपूजन सोहळ्याला 13 रोजी बांधकाम मंत्र्यांसह मान्यवरांच्या उपस्थिती*
राजापूर(प्रतिनीधी):-तालुक्यातील मौजे बागवेवाडी मुख्य रस्ता (धामणपी तिठा, बागवेवाडी, परटवली मुस्लिम वाडी, ताम्हाणे फाटा) या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता पार पडणार आहे.
सदर भूमिपूजन सोहळा रविंद्र चव्हाण (सार्वजनिक बांधकाम मंत्री), उदय सामंत (पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा), नारायण राणे (खासदार रत्नागिरी सिंधुदुर्ग ज्ञजिल्हा), किरण सामंत (सिंधुरत्न समृध्दी योजना सदस्य) आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून या कार्यक्रमाला कु. निलम हातणकर सरपंच ओशिवळे बागवेवाडी, शिवराम कामतेकर उपसरपंच, संजय रोडे तंटामुक्ती अध्यक्ष, अमोल ओटवणेकर कार्यकारी अभियंता सा.बां वि. रत्नागिरी, प्रमोद कांबळे उपविभागीय अधिकारी सा.बां वि राजापूर, अंकुश हातणकर, भास्कर सुतार भाजपा तालुका अध्यक्ष, दिपक नागले शिवसेना तालुका अध्यक्ष, आदिनाथ कपाळे आमदार सदाभाऊ खोत यांचे स्वीय सहाय्यक, संतोष आरावकर जिल्हाध्यक्ष रयत क्रांती संघटना, कमलेश गांगण अध्यक्ष बालमित्र मंडळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत सदर भुमिपूजन सोहळ्याला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बागवेवाडी उत्कर्ष मंडळाच्या वतीने संतोष शेट्ये अध्यक्ष सुर्यकांत चौघुले कार्याध्यक्ष, विजय पांचाळ सचिव, रोहन मसुरकर खजिनदार यांनी केले आहे.