*आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित (एडीबी) महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प टप्पा-3, अंतर्गत 24 जिल्ह्यातील रु.12,768 कोटी किंमतीची 1480 कि.मी. लांबीच्या, दुपदरी सिमेंट क्रॉकिंट रस्त्यांचे ऑनलाईन
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित (एडीबी) महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प टप्पा-3, अंतर्गत 24 जिल्ह्यातील रु.12,768 कोटी किंमतीची 1480 कि.मी. लांबीच्या, दुपदरी सिमेंट क्रॉकिंट रस्त्यांचे ऑनलाईन
*आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित (एडीबी) महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प टप्पा-3, अंतर्गत 24 जिल्ह्यातील रु.12,768 कोटी किंमतीची 1480 कि.मी. लांबीच्या, दुपदरी सिमेंट क्रॉकिंट रस्त्यांचे ऑनलाईन भूमिपूजन संपन्न-सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती*
मुंबई(प्रतिनीधी):-सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित (एडीबी) महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प टप्पा-3 अंतर्गत राज्यातील 24 जिल्ह्यातील 44 विधानसभा मतदारसंघातील रु. 12,768 कोटी किंमतीची 1480 कि.मी. लांबीच्या दुपदरी सिमेंट क्रॉकिंट रस्त्यांचे भूमिपूजन एकाच वेळी त्या-त्या ठिकाणी पार पडले. मुख्य भूमिपूजन समारंभ ऑनलाईन पध्दतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पार पडला. यावेळी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा पाटणकर म्हैसकर, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बृजेळ दिक्षित, सचिव सदाशिव साळुंखे, सचिव संजय दशपुते, माजी आमदार प्रमोद जठार, मुख्य अभियंता राजभोज यांच्यसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे व महामंडळाचे अधिकारी मंत्रालयातील ऑनलाईन समारंभस्थळी उपस्थित होते.
राज्यातील रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी 2018 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून ए.डी.बी. अर्थात आशियाई विकास बँकेकडून अर्थसहाय्य घेण्याचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला. आशियाई विकास बँक प्रकल्पाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण 919 कि.मी. लांबीच्या रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली. त्यापैकी 450 कि.मी. लांबीचे रस्ते पूर्ण झाले असून उर्वरित 469 कि.मी. लांबीच्या रस्त्यांची कामे प्रगतीपथावर असून 75 टक्के कामे पूर्ण झाली आहेत.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित (एडीबी) महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प टप्पा-3 अंतर्गत रु.12,768 कोटी किंमतीची 1480 कि.मी. लांबीच्या दुपदरी सिमेंट काँक्रीट रस्त्यांची 44 कामे राज्यात विविध मतदारसंघात हाती घेण्यात आलेली असून यामध्ये एडीबीकडून 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर (रु.4150 कोटी) इतके अर्थसहाय्य प्राप्त होणार आहे. उर्वरित रक्कम केंद्र शासन सहाय्य (Soft Loan) व राज्य शासनाच्या अर्थसंकल्पातून उपलब्ध होणार आहे. एडीबीच्या माध्यमातून होणा-या कामांमध्ये जिल्हानिहाय कामे पुढीलप्रमाणे, लातूर-2, जालना व परभणी-2, हिंगोली -2, बुलढाणा -3, यवतमाळ -1, छत्रपती संभाजीनगर -3, बीड -2, धाराशिव -1, नंदुरबार -1, जळगाव -3, धुळे -2, अहमदनगर -4, सोलापूर -2, सिंधुदुर्ग -2, ठाणे -1, सातारा -1, कोल्हापूर -1, पुणे -4, पालघर -1, नाशिक -1, नागपूर -3, चंद्रपूर -1, वर्धा -2 अशी 24 जिल्ह्यातील एकूण 44 मतदार संघातील कामे समाविष्ट आहेत. या कामांच्या जाहीर निविदा बोलावून ठेकेदार निश्चिती करण्यात आली आहे व लवकरच सदरची कामे सुरु होणार आहेत. सदर रस्त्यांमुळे तेथील गावांमधील नागरिकांचा रोजचा प्रवास सुखकर होणार आहे. तसेच औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील वाहतूक सोयीची होणार आहे. तसेच धार्मिक स्थळे व पर्यटन स्थळे चांगल्या दज्यांच्या रस्त्यांनी जोडली जाणार आहेत. त्यामुळे नवीन उद्योग निर्मिती होऊन स्थानिक नागरिकांसाठी रोजगार उपलब्ध होणार आहेत.
पर्यावरण संवर्धनासाठी रस्त्याच्या दुतर्फा अंदाजे 3 लक्ष झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच या प्रकल्पांतर्गत Bridge cum Bandhara बांधण्यात येणार आहेत व त्यामुळे लगतच्या भागाची पाण्याचो पातळी उंचावण्यास मदत होणार आहे. रस्त्याच्या लांबीमधील शाळांमध्ये शालेय विद्यार्थीनींसाठी स्वच्छतागृहांचे बांधकाम करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी बस निवारे बांधण्यात येणार आहेत. भूजल पातळी वाढविण्यासाठी पाईप मोऱ्यांच्या ठिकाणी जल पुनर्भरण व्यवस्था उभारण्यात येणार आहे. प्रकल्प राबविताना सामाजिक व पर्यावरण सुरक्षा सांभाळली जाणार आहे.