*सैनिकी विद्यालयाने राबविला "प्लास्टिक हटवा, पर्यावरण वाचवा" उपक्रम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सैनिकी विद्यालयाने राबविला "प्लास्टिक हटवा, पर्यावरण वाचवा" उपक्रम*
*सैनिकी विद्यालयाने राबविला "प्लास्टिक हटवा, पर्यावरण वाचवा" उपक्रम*
नंदूरबार(प्रतिनीधी):-नंदुरबार तालुक्यातील पथराई येथील के. डी. गावित सैनिकी विद्यालय कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक असा उपक्रम राबविला यात "प्लास्टिक हटवा पर्यावरण वाचवा"अशा वेगवेगळ्या पर्यावरण पूरक घोषणा देत सैनिकी वेशातील विद्यार्थ्यांनी नंदुरबार शहरातील पंडित नेहरू पुतळा येथून रॅली सुरू करून ती एकलव्य विद्यालय, नवी नगरपालिका, आमदार कार्यालय, अंधारे स्टॉप व खोडाई माता यात्रा येथून थेट खोडाई मातेच्या मंदिरापर्यंत काढण्यात आली. यावेळी जवळजवळ 12000 कागदी पिशव्यांचे वाटप यात्रेतील यात्रेकरूंना करण्यात आले व यात्रेकरूंमध्ये पर्यावरणाविषयीची जागृती करण्यात आली. व प्लास्टिक मुक्त भारत ही संकल्पना रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्राचार्य शरद बागुल यांनी पर्यावरण पूरक कागदी पिशव्यांचा वापर करणे महत्वाचे आहे असे स्पष्ट केले. दरवर्षी खोडाई माता परिसरात नवरात्री आणि यात्रेचे औचित्य साधून हा पर्यावरणाचा जागर केला जातो. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या कागदी पिशवी वाटप यातून सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण प्रती प्रेम ह्या भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होतात असे सांगितले. याप्रसंगी संस्थेच्या सचिव ऋषिका राजेंद्रकुमार गावित यांनी देखील आदिवासी देवमोगरा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावित हे आम्हाला विविध सामाजिक कार्यासाठी प्रोहत्सन देत असतात असे सांगितले. संस्था नेहमीच शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी अग्रेसर असते असे देखील प्रतिपादन केले. संस्थेचे कार्यालयीन अधीक्षक वसंत पाटील, शाळेचे प्राचार्य शरद बागुल तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावित, सचिव विभूती गावित यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी पोलीस प्रशासनाने देखील या उपक्रमासाठी अतिशय मोलाचे सहकार्य केले.