*डीझनी स्कूल व महेंद्र पब्लिक स्कूल मार्फत विद्यार्थी व महिला पालकांसाठी गरबा नृत्य स्पर्धा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*डीझनी स्कूल व महेंद्र पब्लिक स्कूल मार्फत विद्यार्थी व महिला पालकांसाठी गरबा नृत्य स्पर्धा*
*डीझनी स्कूल व महेंद्र पब्लिक स्कूल मार्फत विद्यार्थी व महिला पालकांसाठी गरबा नृत्य स्पर्धा*
नंदुरबार(प्रतिनीधी):-नंदुरबार येथील डीझनी स्कूल व महेंद्र पब्लिक स्कूल मार्फत विद्यार्थी व महिला पालकांसाठी गरबा नृत्य स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सुमारे 200 हून अधिक विद्यार्थिनी, विद्यार्थी व महिला पालक सहभागी झाले होते. त्यात उत्कृष्ट नृत्य, उत्कृष्ट ड्रेस, उत्कृष्ट मेकअप, उत्कृष्ट ॲक्शन अशा विविध प्रकारांचा समावेश होता त्यात गरब्याच्या सर्वांनी मनसोक्त आनंद घेतला. यावेळी गरबा नृत्यात विविध गटातील सुमारे 30 स्पर्धकांना बक्षीस वाटप करण्यात आले. यावेळी लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष शेखर कोतवाल, संस्थेच्या संचालिका पिनल शाह, मोंटू कांकरिया, मुख्याध्यापक अरुण पाटील हे उपस्थित होते. यावेळी स्पर्धेचे परीक्षण आचल तोष्णीवाल, सिद्धी पटेल यांनी केले. यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षकांनी परिश्रम घेतले.