*नंदुरबार जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा, अध्यक्ष, उपाध्यक्षसह सभापती यांच्या अनुपस्थितीमुळे रद्द, तर कोरम पूर्ण झाल्याने विरोधकांमध्ये नाराजी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा, अध्यक्ष, उपाध्यक्षसह सभापती यांच्या अनुपस्थितीमुळे रद्द, तर कोरम पूर्ण झाल्याने विरोधकांमध्ये नाराजी*
*नंदुरबार जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा, अध्यक्ष, उपाध्यक्षसह सभापती यांच्या अनुपस्थितीमुळे रद्द, तर कोरम पूर्ण झाल्याने विरोधकांमध्ये नाराजी*
नंदुरबार(प्रतिनीधी):-नंदुरबार जिल्हा परिषदेची स्थायी समिती सभा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यासह सभापती तसेच सत्ताधारी पक्षातील सदस्य यांच्या अनुपस्थितीमुळे तहकूब करावी लागली. तसेच सभेचे कोरम पूर्ण न झाल्यामुळे सदरची सभा ही तहकुब करावी लागली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासनाकडून देण्यात आली आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत ऐकून आठ सदस्य व विषय समित्यांचे चार सभापतीसह अध्यक्ष, उपाध्यक्ष असे चौदा सदस्य असतांना, आजच्या स्थायी समितीच्या सभेत जिल्हा परिषदेच्या आरोग्य शिक्षण विभागाचे सभापती गणेश पराडके यांच्यासह जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे विरोधी पक्ष नेते राया मावची यांच्यासह गटनेते सी के पाडवी स्थायी समिती सदस्य रतन पाडवी व जयश्री पाटील या पाच सदस्यांची उपस्थिती असल्याने कोरम पूर्ण होवू शकला नाही. यावर विरोधकांकडून आरोप करण्यात आला की, सत्ताधाऱ्यांमध्येच बेबनाव असल्याने सभा तहकूब करण्याची वेळ आली, नंदुरबार जिल्हा परिषदेची मासिक स्थायी समितीची सभा जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात आयोजित करण्यात आली होती, या सभेचे सर्व स्थायी समितीच्या सदस्यांना 4 सप्टेंबर रोजी अजेंडा पाठविण्यात आला होता. त्यानुसार दुपारी 2 वाजता संपन्न होणाऱ्या सभेची तयारी पूर्ण करण्यात आली होती. या सभेस जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. मात्र, तासभरानंतरही सभेसाठी आवश्यक असलेल्या सदस्यांचा कोरम पूर्ण न झाल्याने, स्थायी समितीचे सभापती गणेश पराडके, विरोधी पक्ष नेते राया मावची, सदस्य रतन पाडवी, सी. के. पाडवी, जयश्री पाटील उपस्थित होते. स्थायी समिती सभेसाठी कोरम पूर्ण होण्यासाठी सुमारे आठ सदस्य आवश्यक असतात. मात्र, अवघे पाच सदस्य उपस्थित असल्याने सदरची सभा आजच्या स्थायी समितीचे सभापती गणेश पराडके यांच्या आदेशान्वये तहकूब करण्यात आली. नंदूरबार जिल्ह्यात जनसामान्यांच्या अनेक समस्या रोज वाढत असून सत्ताधाऱ्यांमध्ये आश्या प्रकारे बेबनाव असल्याने सभा तहकुब करण्याची वेळ येणे दुर्दैवी असल्याचे सांगत, विरोधकांनी खंत व्यक्त केली. आजची रद्द झालेली पुढील सभा ही 20 सप्टेंबर रोजी सभा घेण्याचे नियोजन असल्याचे नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी एस कोल्हे यांनी सांगितले. तर आज रद्द झालेल्या स्थायी समितीबाबत जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे विरोधी पक्ष नेते राया मावची यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की,
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. रस्त्यांसह शेतकऱ्यांचे अनेक महत्वाचे प्रश्न असतांना जि.प.ची सभा केवळ कोरम पूर्ण न झाल्याने तहकूब करावी लागली. सभेला सत्ताधारीच उपस्थित राहिले नाहीत.यातून सत्ताधाऱ्यांमध्ये एकमत नसून हुकूमशाही पध्दतीने कारभार सुरु आहे.सभेची नियोजित वेळ दोन वाजेची असतांना केवळ चार ते पाच सदस्य उपस्थित होते.उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली सभा होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, तीन वाजूनदेखील कोरम पूर्ण न झाल्याने सभा तहकूब करावी लागली.