*भजनी मंडळामार्फत भादवडला प्रबोधन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*भजनी मंडळामार्फत भादवडला प्रबोधन*
*भजनी मंडळामार्फत भादवडला प्रबोधन*
नंदुरबार(प्रतिनीधी):-तालुक्यातील भादवड येथील भजनी मंडळ व सरस्वती कला क्रीडा मंडळातर्फे गावात समाज प्रबोधन पर कार्यक्रम घेण्यात आले. भजनी मंडळाच्या माध्यमातून स्त्री भृण हत्या, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता मोहीम यासह विविध विषयांवर प्रबोधन करण्यात आले. यासोबत गणेशोत्सव व विविध उत्सवाच्या काळात मंडळमार्फत भजनाद्वारे जनजागृती करण्यात येत असते. तसेच शासनाच्या विविध योजना संदर्भात देखील जनजागृती करण्यात येते. या भजनी मंडळामार्फत झालेल्या कार्यक्रमात मंडळाचे सदस्य नारायण पाटील, हसरत पाटील, धुडकू पाटील, दादा पाटील, राजेंद्र गिरासे, सरदारसिंग राजपूत, हिरालाल पाटील, शाना न्हावी, शोभा पाटील, दिलीप पाटील, राजेंद्र पाटील, बंडू सिंग गिरासे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.