*हिरा प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेत 'स्वातंत्र्यदिनानिमित्त' ध्वजारोहण सोहळा देशभक्तीचा गौरव करत सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*हिरा प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेत 'स्वातंत्र्यदिनानिमित्त' ध्वजारोहण सोहळा देशभक्तीचा गौरव करत सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा*
*हिरा प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेत 'स्वातंत्र्यदिनानिमित्त' ध्वजारोहण सोहळा देशभक्तीचा गौरव करत सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा*
नंदुरबार(प्रतिनीधी):-हिरा प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेत 'स्वातंत्र्यदिनानिमित्त' ध्वजारोहण सोहळा देशभक्तीचा गौरव करत सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा व संस्थेचे अध्यक्ष डॉ.रविंद्र हिरालाल चौधरी यांच्या नाविण्यपूर्ण 'संकल्पनेतुन इंटरॅक्टिव्ह इंटेलिजन्स पॅनल'चे उदघाटन संपन्न. 15 ऑगस्ट रोजी भारताचा 78 वा 'स्वातंत्र्यदिन ध्वजारोहण समारंभ सोहळा' हिरा प्रतिष्ठान संचलित पी.के.पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी प्राथमिक विद्यामंदिर, इंदुबाई हिरालाल चौधरी प्राथमिक विद्यामंदिर, संस्कृती शिशु विहार व नूतन बाल मंदिर यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रमुख मान्यवर डॉ. सचिन जयराम नांद्रे
(संचालक राष्ट्रीय सेवा योजना कवयित्री बहिणाबाई चौधरी उ.म.वी जळगाव) यांच्या शुभहस्ते शालेय प्रांगणात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न करण्यात आला. त्यावेळी डाॅ.किशोर पवार (कवयित्री बहिणाबाई चौधरी उ.म.वि जळगाव माजी कुलसचिव तथा ट्रायबल अकॅडमी, नंदुरबार) लक्ष्मीकांत चव्हाण (अँडीशनल एक्झीकेटिव्ह इंजिनिअर), विनय वळवी (असिस्टंट इंजिनिअर महावितरण नंदुरबार), विश्वास भामरे (विभागीय समन्वय), श्रीमती. मनिषा पाडवी (महाव्यवस्थापक ,नंदुरबार) हिरा प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष डॉ.रविंद्र हिरालाल चौधरी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख मान्यवरांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डाॅ. रविंद्र हिरालाल चौधरी यांच्या शुभहस्ते शाॅल, ग्रंथ तसेच वृक्षरोप देऊन करण्यात आला. तसेच संस्थेचे संचालक बलवंत दगडुशेठ जाधव यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांना देखील समस्त मान्यवरांच्या उपस्थितीत जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर डाॅ. सचिन जयराम नांद्रे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत भारतीय स्वातंत्र्याचा ऐतिहासिक कार्यकाळाला उजाळा देत हर घर तिरंगा या विषयी महत्व विशद करुन नंदनगरीतील हुतात्मा शिरीष कुमार याचे बलिदान आपल्याला देशाप्रति निष्ठा, प्रेम, समर्पणाची भावना शिकवते म्हणुन भारतीय असल्याचा आपण सर्वांनी अभिमान बाळगा असे सांगत स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा प्रदान केल्यात त्या नंतर लक्ष्मीकांत चव्हाण यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सौर उर्जा (सूर्य घर योजना) विषयी मार्गदर्शन करुन कार्यक्रमाचे कौतुक केले. या समारंभ सोहळा प्रसंगी संस्थेच्या अधिनिस्त समस्त पदाधिकारी संचालक बलवंत दगडुशेठ जाधव, संचालक सुधीर वामनराव भोलाणे, संचालक सुरज जगदीश जयस्वाल, हिरा फाऊंडेशन संचालिका सौ. प्रणिता नरेंद्र चौधरी, हिरा उद्योग समूहाचे युवा उद्योजक प्रथमेश शिरीष चौधरी, गौरव नरेंद्र चौधरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सुरेंद्र पाटील, प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक रुपेश चौधरी, किरण त्रिवेदी, वरिष्ठ महाविद्यालयाचे उप प्राचार्य डाॅ.चंद्रकांत वाणी तसेच सर्व शाखेतील विभागाचे प्राध्यापक-प्राध्यापिका, शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिरा प्रतिष्ठान अधिनिस्त सर्व विद्यालयांच्या वतीने देशभक्तीपर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यात थोर, महान क्रांतिकारांची तथा महापुरुषांची वेशभूषा, देशभक्तीच्या संदेश देणारे नृत्य, समूहनृत्य, वकृत्व अशा विविध कलागुणांचे सादरीकरण करत विद्यार्थ्यांनी देशप्रेमाचा व भारतीय एकतेचा संदेश देत आनंद साजरा करुन "हर घर तिरंगा' या उपक्रमातही सहभाग नोंदविला. भारतीय स्वातंत्र्य दिवस शुभपर्वावर हिरा प्रतिष्ठान संस्थेचे आधारस्तंभ संस्थापक हिरालाल मगनलाल चौधरी व संस्थेचे अध्यक्ष डॉ. रविंद्र हिरालाल चौधरी यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून शाळेत लावण्यात आलेल्या इंटरॅक्टिव्ह इंटेलिजन्स पॅनल (डिजिटल स्मार्ट बोर्ड क्लासरूम) चे उद्घाटन देखील आज करण्यात आले. त्यावेळी आय.टी विषय प्राध्यापक सुनील मोरे यांनी सदर डिजिटल पॅनल विषयी उपस्थितांना माहिती देत अध्यापनावर आधारीत विज्ञानाचे विविध प्रात्यक्षिक दाखवून संस्थाचालकांचे सर्वांच्या वतीने मन:पूर्वक आभार मानले त्यावेळी
डिजिटल स्मार्ट बोर्ड क्लासरूम मध्ये इंटरॅक्टिव्ह इंटेलिजन्स पॅनलचा शैक्षणिक अध्यापनासाठी कसा वापर करावा या संदर्भात हिरा प्रतिष्ठान संस्थेचे संचालक व युवा उद्योजक गौरव नरेंद्र चौधरी यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले व या सर्व उपक्रमाला संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी शुभेच्छा प्रदान केल्यात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हितेश चव्हाण व ध्वजारोहणाचे सूत्रसंचालन महेंद्र फटकाळ, सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. नैना सोनवणे व आभार अनिल चौधरी यांनी व्यक्त केले. तर समारंभाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागाचे प्राध्यापक- प्राध्यापिका, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले.