*कांदिवली येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कांदिवली येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न*
*कांदिवली येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न*
मुंबई(प्रतिनीधी):-मंगळवार 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता मुंबई कांदिवली पश्चिम मधील धनगर समाज विकास मंडळाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. मंडळाचे कार्याध्यक्ष सुनील भगत प्लांट नंबर 242,रुम नंबर डी 46, गणेश गल्ली, सेक्टर 2 या ठिकाणी सदर कार्यक्रम पार पडला. मंडळाचे पदाधिकारी, समाज बांधव, भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. " येळकोट येळकोट जय मल्हार" या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या वेळी मंडळाचे संस्थापक सदस्य व प्रवक्ता भारत कवितके यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवना बदल सखोल व महत्त्व पूर्ण माहिती सांगितली. मंडळाचे अध्यक्ष शिवाजी पिसे यांनी मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला. सचीव नारायण पिसे यांनी मंडळा जमा खर्चाचा तपशील सांगितला. संस्थापक सदस्य संतोष पिसे यांनी मंडळाचे पुढचे धोरण स्पष्ट केले.या विनम्र अभिवादन प्रसंगी भारत कवितके, आप्पासाहेब कुचेकर, मल्हारी लाळगे, सदानंद लाळगे, संतोष पिसे शिवाजी पिसे, महेंद्र काळे, सतिश पिसे, नारायण पिसे, किरण चांगण, बाळासाहेब कुचेकर, निवृत्ती भोजणे, सौ. आशा भगत, सौ, सुरेखा कुचेकर व इतर समाज बांधव उपस्थित होते.