*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसंदर्भात नवापूर तहसील कार्यालयात तालुकास्तरीय शासकीय समितीची बैठक संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसंदर्भात नवापूर तहसील कार्यालयात तालुकास्तरीय शासकीय समितीची बैठक संपन्न*
*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसंदर्भात नवापूर तहसील कार्यालयात तालुकास्तरीय शासकीय समितीची बैठक संपन्न*
नंदूरबार(प्रतिनीधी):-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसंदर्भात आज नवापूर येथील तहसील कार्यालयात तालुकास्तरीय शासकीय समितीची बैठक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नवापूर विधानसभा क्षेत्र समितीचे अध्यक्ष भरत माणिकराव गावित यांच्या अध्यक्षतेखाली व प्रभारी तहसीलदार श्रीमती. सुरेखा जगताप, नवापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी स्वप्नील मुधलवाडकर, बालविकास प्रकल्प अधिकारी व सदस्य प्रणव सोनार यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या योजनेअंतर्गत आजवर झालेल्या कामाचा आढावा घेऊन योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावी कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनास दिले.
राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही महत्त्वपूर्ण योजना सुरू केली असून, या योजनेअंतर्गत राज्य सरकार आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा 1500 रुपये देणार आहे. तसेच या योजनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करावे. या योजनेची अंमलबजावणी करताना कुठेही महिला-भगिनींची अडवणूक होता कामा नये,तसेच ज्यांच्या कागदपत्रात त्रुटी असतील त्यांचे पण कागदपत्रे पूर्तता करून लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे अशा सूचना भरत गावित यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. शासनाने गठीत केलेल्या नवापूर विधानसभा क्षेत्र समितीला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज मंजूर करण्याचे अधिकार आहेत व आजवर नवापूर तालुक्यातून 50 हजार अर्ज भरले गेल्याचे प्रशासनाकडून माहिती प्राप्त झाली आहे, यात ज्यांचे अर्ज वैध असतील त्यांच्या राष्ट्रीयकृत बँक खात्यात 1500 रु.जमा होतील व ज्यांच्या अर्ज मध्ये काही त्रुटी असतील त्यांच्या कागदपत्रे पुर्तता करून त्यांना पण लाभ मिळवून देण्यात येईल. नवापूर तालुक्यातील ज्या माता भगिनींचे अर्ज भरावयाचे बाकी असतील त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज भरावे, तसेच अर्ज भरण्यासाठी कुठल्याही प्रकारची फी देऊ नये, अगर पैश्यांची मागणी होत असेल तर तसे तात्काळ संपर्क करावे. असे आवाहन भरत गावित यांनी केले आहे. या बैठकीला समितीचे सदस्य व शासकीय कर्मचारी उपस्थित होते.