*मकर संक्रांती-भोगी हा दिवस ‘पौष्टिक तृणधान्य दिन’ म्हणून साजरा करावा कृषी विभागाचे आवाहन
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मकर संक्रांती-भोगी हा दिवस ‘पौष्टिक तृणधान्य दिन’ म्हणून साजरा करावा कृषी विभागाचे आवाहन
*मकर संक्रांती-भोगी हा दिवस ‘पौष्टिक तृणधान्य दिन’ म्हणून साजरा करावा कृषी विभागाचे आवाहन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-पौष्टिक तृणधान्य युक्त पदार्थाचा वापर आहारातील महत्व व त्याचे फायदे सर्वसामान्य लोकांना माहिती व्हावे यासाठी ‘मकर संक्रांती-भोगी’ हा दिवस दरवषी ‘पौष्टिक तृणधान्य दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती पुणे कृषि आयुक्तालयाचे संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.पौष्टीक तृणधान्याचे महत्व सर्व जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी राज्यात “आंतरराष्ट्रीय पौष्टिक वर्ष, 2023 ” साजरा करण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2023 हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून घोषित केले आहे. त्याअनुषंगाने कृषि विभागामार्फत या दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व सामान्य लोकांपर्यंत पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्व, त्याचे फायदे काय आहेत या बरोबरच तृणधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढ कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.या दिवशी प्रत्येक कृषि सहाय्यक आपल्या गावांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्यावर आधारित चर्चासत्राचे आयोजन, तृणधान्य पिकांच्या विविध जाती, त्यांचे लागवड तंत्रज्ञान, तृणधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा, मुलाखती, तृणधान्य पिकांपासून बनवण्यात येणारे विविध उपपदार्थ यांची माहिती देणे यासाठी प्रगतीशील शेतकरी,आहार तज्ञ, विद्यापीठांचे शास्त्रज्ञ यांना निमंत्रित करून कार्यक्रमांचे आयोजन करणार आहेत. तसेच ज्या विभागांमार्फत बालके, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, कामगारांना उपहारगृहातून फराळ, मध्यान्ह भोजन पूरविण्यात येते अशा विभागांनी या दिवशी त्यांच्या आहारांमध्ये पौष्टिक तृणधान्यांचा जाणीवपुर्वक वापर करावा, असे आवाहनही कृषि विभागाने केले आहे.