*पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अर्जुना नदीवर बांधला श्रमदानातून बंधारा,आंगले सौंदाळकर वाडीतील ग्रामस्थांचा स्तुत्य उपक्रम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अर्जुना नदीवर बांधला श्रमदानातून बंधारा,आंगले सौंदाळकर वाडीतील ग्रामस्थांचा स्तुत्य उपक्रम*
*पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अर्जुना नदीवर बांधला श्रमदानातून बंधारा,आंगले सौंदाळकर वाडीतील ग्रामस्थांचा स्तुत्य उपक्रम*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील आंगले सौंदाळकरवाडी येथील ग्रामस्थांनी अर्जुना नदी पात्रात श्रमदानातून बंधारा बांधून पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला आहे. यावर्षीच्या झालेल्या कमी पावसामुळे नोव्हेंबर महिन्यापासूनच नदीपात्रात पाण्याचा साठा कमी पडायला लागल्याने नदीपात्रात पाणी साठा करून पुढील सहा महिन्यांत भेडसावणाऱ्या पाणी समस्येला सामोरे जाणे हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून आतापासूनच पाणी साठा करणे गरजेचे आहे. हे गावकरी मंडळीनी जाणले. ग्रामस्थांनी श्रमदान करून अर्जुना नदीवर बांधलेल्या बंधाऱ्याला आंगले ग्रामपंचायतीच्या माध्यमातून साहित्य पुरविण्यात आले. याकामी पुरूष मंडळी सह महिला मंडळींच्या सहकार्याने नदीपात्रातील लांबलचक बंधारा बांधण्याचे काम 24 नोव्हेंबर रोजी करण्यात आले.



