*विखरण येथे संविधान दिनानिमित्त निबंध स्पर्धेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विखरण येथे संविधान दिनानिमित्त निबंध स्पर्धेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन*
*विखरण येथे संविधान दिनानिमित्त निबंध स्पर्धेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तालुक्यातील धंगाई विधायक कार्य मंडळ म्हसदी संचलित आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय, विखरण येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर उपस्थित सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी एकत्रितपणे भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे (प्रास्ताविकेचे) वाचन केले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. डी.साळुंके यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व, नागरिकांचे हक्क व कर्तव्ये याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. 'न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता'ही संविधानाची मूलभूत मूल्ये विद्यार्थ्यांनी जीवनात जपली पाहिजेत,असा संदेश यावेळी देण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी संविधानावर आधारित निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शाळेतील इयत्ता 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक व्ही.बी. अहिरे व तर आभार डॉ.आर. आर.बागुल यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षक सी.व्ही. नांद्रे, डी.बी. भारती, एम.डी. नेरकर,वाय.डी.बागुल, एम.एस. मराठे, ए.एस. बेडसे, एस.एच. गायकवाड तसेच जे.एस. पाटील, एस.जी.पाटील, एच.एम.खैरनार यांनी संयोजन केले.



