*जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यात 78 उमेदवारांची प्राथमिक निवड,नियुक्तीपत्रांचे वितरण*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यात 78 उमेदवारांची प्राथमिक निवड,नियुक्तीपत्रांचे वितरण*
*जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यात 78 उमेदवारांची प्राथमिक निवड,नियुक्तीपत्रांचे वितरण*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार, आगाखान ग्राम समर्थन कार्यक्रम (भारत) आणि शबरीमाता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नवापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 78 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. निवड झालेल्या उमेदवारांना सहायक आयुक्त सुरज महाजन यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. नवापूर येथील शबरीमाता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित या मेळाव्यात जिल्ह्यातील 141 उमेदवारांनी सहभाग नोंदविला. विविध औद्योगिक व कॉर्पोरेट क्षेत्रांतील 12 कंपन्यांनी सहभाग घेत उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. शैक्षणिक पात्रता, तांत्रिक कौशल्य आणि अनुभवाच्या आधारे निवड प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुरज महाजन, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रतिनिधी दीपक पाथरवट, आगाखान ग्राम समर्थन कार्यक्रमाच्या प्रतिनिधी ज्योती कपाळे, भूषण वानखेडे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, उद्योगांच्या गरजेनुसार कौशल्याधारित रोजगार मिळवून देणे आणि युवकांना स्वावलंबी बनविणे हा या मेळाव्याचा उद्देश आहे. नोकरी इच्छुक उमेदवार आणि उद्योजक यांच्यात समन्वय साधण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत असे मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त महाजन यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.



