*भारतीय संविधानदिनानिमित्त संविधान जनजागृती,मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना विनम्र अभिवादन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*भारतीय संविधानदिनानिमित्त संविधान जनजागृती,मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना विनम्र अभिवादन*
*भारतीय संविधानदिनानिमित्त संविधान जनजागृती,मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना विनम्र अभिवादन*
शहादा(प्रतिनिधी):-कला व विज्ञान महिला महाविद्यालय, शहादा येथे राज्यशास्त्र विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाचे कला व विज्ञान महिला महाविद्यालय, शहादा येथे राज्यशास्त्र विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य डॉ. भारत चाळसे, प्रमुख वक्ते प्रा. डॉ. अनिल साळुंके, ग्रंथपाल प्रा. डॉ. प्रसन्न डांगे, राजेश राठोड, प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होते. सर्व प्रथम भारतीय संविधानाची प्रत, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या निमित्ताने विद्यार्थिनींमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, तसेच स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि लोकशाही या संविधानिक मूल्यांची रुजवण व्हावी, हा या उपक्रमांचा मुख्य उद्देशाने ऑनलाइन प्रश्नमंजुषा, व्याख्यान, भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन व संविधान पालनाची प्रतिज्ञा व कार्यक्रमाच्या शेवटी मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना तसेच मारल्या गेलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली देत विनम्र अभिवादन असे उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमात राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. अनिल साळुंके यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करतांना सांगितले की, भारतीय संविधान निर्मितीचा ऐतिहासिक प्रवास, संविधान सभेचे कार्य आणि भारतीय लोकशाहीच्या बळकटीकरणात संविधानाचे महत्त्व विशद केले. भारतीय संविधान हे केवळ शासनव्यवस्थेचे मार्गदर्शक दस्तऐवज नसून देशातील प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार, समान संधी आणि न्यायाची हमी देणारा राष्ट्राचा मूलभूत आधारस्तंभ आहे , असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रसन्न डांगे तर आभार राजेश राठोड यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.



