*राज्यातील नागरिकांना 26 जानेवारीपर्यंत डिजिटल गव्हर्नन्सचा नवा अनुभव मिळण्यासाठी प्रयत्न करावे– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ‘झिरो ब्युरोक्रसी’च्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल, 174 नवीà
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राज्यातील नागरिकांना 26 जानेवारीपर्यंत डिजिटल गव्हर्नन्सचा नवा अनुभव मिळण्यासाठी प्रयत्न करावे– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ‘झिरो ब्युरोक्रसी’च्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल, 174 नवीà
*राज्यातील नागरिकांना 26 जानेवारीपर्यंत डिजिटल गव्हर्नन्सचा नवा अनुभव मिळण्यासाठी प्रयत्न करावे– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ‘झिरो ब्युरोक्रसी’च्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल, 174 नवीन सेवेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ*
मुंबई(प्रतिनिधी):- राज्यातील शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पारदर्शक, गतिमान आणि मानवी हस्तक्षेप कमीत कमी ठेवून पोहोचविण्यासाठी सुरू असलेल्या प्रशासकीय प्रक्रिया पुनर्रचना (जीपीआर) उपक्रमाला अधिक गती द्यावी. येत्या 26 जानेवारीपर्यंत नागरिकांना डिजिटल गव्हर्नन्सचा वेगळा अनुभव देण्याच्या दृष्टीने सर्व विभाग आणि जिल्हा प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. राज्य शासनाच्या 174 सेवा व प्रकल्पांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे लोकार्पण झाले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, विविध विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, तसेच समग्र आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गेल्या दीड-दोन वर्षांपासून शासकीय योजना आणि सेवा नागरिकांपर्यंत विनासायास पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. पारदर्शकता, कार्यक्षमता आणि उत्तरदायित्व या तीन तत्त्वांच्या आधारे प्रशासनात परिवर्तन घडविण्याचे उद्दिष्ट आहे. ‘झिरो ब्युरोक्रसी’ हे आपले ध्येय असून, प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करून अनावश्यक टप्पे आणि मानवी हस्तक्षेप कमी करण्यावर भर देण्यात येत आहे. राज्यातील 1,129 प्रशासकीय प्रक्रिया पुनर्रचनेच्या उद्दिष्टांपैकी आतापर्यंत 397 प्रक्रिया पूर्ण झाल्या असून, सुमारे 35 टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे. याअंतर्गत 174 सेवांचे डिजिटल प्लॅटफॉर्मवर लोकार्पण करण्यात आले आहे. त्यामध्ये मैत्री 2.0 प्लॅटफॉर्मवरील 76, आपले सरकार 2.0 वरील 74 आणि थेट लाभ हस्तांतरण (महाडीबीटी 2.0) अंतर्गत 24 सेवांचा समावेश आहे. महासारथी हा डेटा आधारित प्रशासनासाठी महत्त्वाचा प्लॅटफॉर्म ठरणार असून, विविध शासकीय योजनांची अचूकता आणि सेवा वितरणाची कार्यक्षमता वाढविण्यास त्याचा उपयोग होईल. उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेनंतर संबंधित विभागांकडून शासन निर्णय निर्गमित करणे, त्यानंतर डिजिटल आर्किटेक्चर आणि सेवा उपयोगाच्या प्रक्रिया विकसित करणे, अशी निश्चित कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत 729 शासन निर्णय निर्गमित झाले आहेत. तसेच सुमारे 350 सेवांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. येत्या 24 डिसेंबरपर्यंत आणखी काही महत्त्वाच्या सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे प्रलंबित मान्यता आणि तांत्रिक बाबींना प्राधान्य देऊन 31 डिसेंबरपर्यंत आवश्यक तांत्रिक कामे पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
डिजिटल गव्हर्नन्सच्या माध्यमातून अनावश्यक प्रतिज्ञापत्रे रद्द करणे, नागरिकांकडून वारंवार मागितली जाणारी कागदपत्रे कमी करणे आणि पेपरलेस गव्हर्नन्सकडे वाटचाल करणे शक्य होणार आहे. यासाठी केंद्रांचे सक्षमीकरण, नियमित देखरेख आणि तक्रार निवारणावर विशेष लक्ष द्यावे. जिल्हाधिकारी आणि जिल्हास्तरीय यंत्रणांनी यामध्ये सक्रिय भूमिका बजावावी, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. आज आरटीएस 2.0, महाडीबीटी 2.0, मैत्री 2.0, महाउपलब्धी, राज्य-केंद्र शासन पत्रव्यवहार व्यवस्थापन प्रणाली, शासकीय निवासस्थान वाटप व्यवस्थापन प्रणाली आणि महाराष्ट्र आधार डॅशबोर्ड अशा विविध डिजिटल प्रणालींचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
महाउपलब्धी या प्रणालीच्या माध्यमातून निवृत्तीवेतनधारक आणि विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मोबाईलवरच डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करता येणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहून आपण हयात असल्याचे प्रमाणित करण्याची आवश्यकता कमी होणार आहे. केंद्र शासनाशी होणारा पत्रव्यवहार आणि त्यावरील कार्यवाहीचा मागोवा घेण्यासाठी विकसित करण्यात आलेली प्रणालीही महत्त्वपूर्ण ठरेल. तसेच शासकीय निवासस्थानांच्या वाटपात पारदर्शकता आणणे आणि आधारशी संबंधित सेवांचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी नवीन प्रणालींचा उपयोग होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांनी ग्रामीण युवकांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून उद्योजक बनविण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या योजनेची माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने आणि महाआयटीच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेली ही योजना पूर्णतः ऑनलाइन आणि पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेतून अंडी, दूध, पोल्ट्री आणि मांस उत्पादनासह शेळीपालन व वराहपालन यांसारख्या क्षेत्रांत ग्रामीण भागात उद्योजकतेला प्रोत्साहन दिले जाणार आहे. यामुळे ग्रामीण भागात उत्पादन समूह (क्लस्टर) विकसित होण्यास मदत होईल. योजनेअंतर्गत सर्वसाधारण लाभार्थ्यांना 50 टक्के, तर महिला आणि अनुसूचित जाती-जमातींच्या लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील अर्जांनंतर जिल्हानिहाय क्लस्टर उभारणीचे नियोजन करण्यात येईल. इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले. संविधानाने नागरिकांना दिलेले अधिकार प्रत्यक्षात मिळण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ योग्य कार्यपद्धतीने, जलद आणि पारदर्शकपणे मिळणे आवश्यक आहे. आरटीएस 2.0 मध्ये 74 नागरी सेवांची भर, महाडीबीटीवरील योजनांच्या संख्येत वाढ आणि मैत्री प्लॅटफॉर्मवरील सेवांचा विस्तार ही नागरिकाभिमुख प्रशासनाच्या दिशेने महत्त्वाची पावले आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले
मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी प्रशासकीय प्रक्रिया पुनर्रचनेच्या कामाचा आढावा घेतला. महाआयटीला सक्षम करणे, महासारथी या प्रणालींचे बॅकएंड विकसित करणे तसेच केंद्र शासनाच्या विविध डेटाबेसशी जोडणी करणारा एपीआय सेतू तयार करण्यावर सुरुवातीपासून भर देण्यात आला आहे. सर्व विभागांच्या सचिवांनी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतल्यामुळे प्रगती शक्य झाली आहे.
प्रशासकीय प्रक्रिया पुनर्रचनेत अनावश्यक सेवा रद्द करणे, उपलब्ध माहितीच्या आधारे प्रमाणपत्रे व कागदपत्रे स्वयंचलितपणे उपलब्ध करून देणे, समान स्वरूपाच्या सेवांचे एकत्रीकरण, अर्जातील माहितीची क्षेत्रे व आवश्यक कागदपत्रे कमी करणे, मंजुरीचे टप्पे कमी करणे आणि अधिकारांचे विकेंद्रीकरण करणे या बाबींवर भर देण्यात आला आहे. आतापर्यंत शंभरहून अधिक अनावश्यक सेवा रद्द करण्यात आल्या असून, कागदपत्रांची आवश्यकता 50 टक्क्यांहून अधिक कमी करण्यात आली आहे. बहुतांश विभागांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना अधिकारांचे विकेंद्रीकरण केले आहे. या अधिकारांचा योग्य वापर करण्याचे आवाहनही मुख्य सचिव अग्रवाल यांनी यावेळी केले*



