*एकलव्य विद्यालय व जयंत गणपत नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा, ‘संविधान हे केवळ पुस्तक नसून आदर्श जीवन जगण्याची संहिता आहे’–प्रा.पुष्पराज पारधी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*एकलव्य विद्यालय व जयंत गणपत नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा, ‘संविधान हे केवळ पुस्तक नसून आदर्श जीवन जगण्याची संहिता आहे’–प्रा.पुष्पराज पारधी*
*एकलव्य विद्यालय व जयंत गणपत नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा, ‘संविधान हे केवळ पुस्तक नसून आदर्श जीवन जगण्याची संहिता आहे’–प्रा.पुष्पराज पारधी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील एकलव्य विद्यालय व जयंत गणपत नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे पूजन करून संविधानाप्रती आदर व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मीनल वसावे यांनी केले. त्यांनी संविधान दिनाचे महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची ओळख करून दिली. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना प्रा. पुष्पराज पारधी म्हणाले की, “संविधान हे केवळ पुस्तक नसून आदर्श जीवन जगण्याची संहिता आहे. संविधानाने प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार प्रदान करण्याबरोबरच कर्तव्यांचीही जाणीव करून दिली आहे. त्यामुळे प्रत्येकाने संविधानाचा अभ्यास करून संविधानिक मूल्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकार करणे आवश्यक आहे.”
आपल्या मार्गदर्शनात त्यांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीचा इतिहास, संविधान निर्मितीसाठी लागलेला कालावधी, संविधानातील विविध कलमे, मूलभूत अधिकार व कर्तव्ये यांची सविस्तर माहिती दिली. भारतीय संविधान हे जगातील सर्वांत मोठे लिखित संविधान असून, त्याच्या निर्मितीमध्ये विविध देशांच्या राज्यघटनांमधील महत्त्वपूर्ण तरतुदींचा स्वीकार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संविधानात वेळोवेळी झालेल्या घटना दुरुस्तींविषयीही त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. प्रत्येक नागरिकाने संविधानिक जीवनशैली स्वीकारून लोकशाही मूल्यांचे जतन व संवर्धन करावे, असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी कु. अश्विनी पाटील हिने भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. प्रा. चंद्रकांत देसले यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डी.के. मराठे उपप्राचार्य डॉ. गिरीश पवार, पर्यवेक्षक टी.एन. पाडवी, प्रा.वर्षा घासकडबी, प्रा. प्रकाश चौधरी प्रा. कृष्णा गांधी, प्रा. कन्हैय्या बोरसे उपस्थित होते.
संविधानातील मूल्ये, अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणारा हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.



