*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे संविधान दिवस साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे संविधान दिवस साजरा*
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे संविधान दिवस साजरा*
तळोदा(प्रतिनिधी):-तालुक्यातील माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे संविधान दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक उमेश पाटील होते तर प्रमुख वक्ते संदीप मोरे, राजेंद्र ढोडरे होते.
कार्यक्रमाची सुरूवात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले.
यानंतर प्रमुख वक्ते संदीप मोरे यांनी सांगीतले की, आजच्या दिवशी 26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान देशाला अर्पण केले. म्हणून आपण या दिवशी संविधान दिन साजरा करतो. तर राजेंद्र ढोडरे यांनी सांगीतले की, भारतीय राज्यघटनेत एकूण 395 कलमे आहेत. तसेच 12 परिशिष्टे आहेत.
आपले संविधान सर्वांना स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय्य याचा अधिकार देते. असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष उमेश पाटील यांनी सांगितले की,
विविधतेने नटलेल्या देशाला गेल्या 75 वर्षांपासून एकसंघ ठेवण्याचे श्रेय जर कोणाला जात असेल तर ते फक्त भारतीय संविधानाला जाते. त्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी संविधानाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. म्हणून आपण त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार
असे म्हणतो. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास पाडवी यांनी केले तर आभार विलास मगरे यांनी व्यक्त केले. तर कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी तुकाराम भील, सुदाम जांभोरे, राहुल साळुंखे, पंकज खेडकर, संतोष राठोड, मोहन वळवी आणि सुबोध जावरे यांनी परिश्रम घेतले.



