*महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या कर्ज योजनांच्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण होणार, योजनांच्या परिणामांचे मूल्यांकन; लाभार्थ्यांनी नियुक्त प्रतिनिधींना सहकार्य करावे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या कर्ज योजनांच्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण होणार, योजनांच्या परिणामांचे मूल्यांकन; लाभार्थ्यांनी नियुक्त प्रतिनिधींना सहकार्य करावे*
*महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या कर्ज योजनांच्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण होणार, योजनांच्या परिणामांचे मूल्यांकन; लाभार्थ्यांनी नियुक्त प्रतिनिधींना सहकार्य करावे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण व योजनांच्या परिणामांचे मूल्यांकन (Impact Assessment) करण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार असून, नंदुरबार जिल्ह्यातील संबंधित लाभार्थ्यांचीही माहिती संकलित करण्यात येणार आहे. अशी माहिती महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक के. जी.जोपळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई या महामंडळाची स्थापना 10 जुलै 1978 रोजी झाली आहे.मागासवर्गीय समाजातील घटकांचे सामाजिक व आर्थिक उत्थान करणे, त्यांना स्वयंरोजगार व व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे हे महामंडळाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या उद्देशाने महामंडळामार्फत विविध कर्ज व आर्थिक सहाय्य योजना राबविण्यात येतात.
महामंडळाच्या विविध कर्ज योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण, योजनांचे मूल्यांकन करण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या सर्वेक्षणासाठी M/s. PriMove Infrastructure Development Consultants Pvt. Ltd. या संस्थेची तांत्रिक सहाय्य संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून कर्जाचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी कर्जाचा वापर कोणत्या व्यवसायासाठी केला, सध्या व्यवसायाची स्थिती काय आहे, रोजगार व उत्पन्नामध्ये किती वाढ झाली, लाभार्थ्यांच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीत कोणते बदल झाले तसेच कर्ज परतफेडीची सद्यस्थिती काय आहे, योजनांचा लाभार्थ्यांच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीवर झालेला परिणाम तसेच कर्ज योजनांच्या लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून माहिती संकलित करण्यात येणार आहे.
याशिवाय कर्ज वितरणानंतर व्यवसाय करताना लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी, व्यवसायाची प्रगती आणि योजनांच्या अंमल बजावणीतील त्रुटींचाही अभ्यास करण्यात येणार आहे. यासाठी नियुक्त प्रतिनिधी लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून आवश्यक माहिती घेणार आहेत. या सर्वेक्षणातून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे महामंडळाच्या योजनांची परिणामकारकता वाढविणे, भविष्यातील योजनांचे अधिक प्रभावी नियोजन करणे आणि लाभार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील महामंडळाच्या विविध कर्ज योजनांचा लाभ घेतलेल्या सर्व लाभार्थ्यांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या नियुक्त प्रतिनिधींना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे.



