*नवापूर येथे 25 नोव्हेंबरला पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 555 रिक्त पदांसाठी 16 नामांकित कंपन्यांकडून थेट मुलाखती*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नवापूर येथे 25 नोव्हेंबरला पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 555 रिक्त पदांसाठी 16 नामांकित कंपन्यांकडून थेट मुलाखती*
*नवापूर येथे 25 नोव्हेंबरला पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 555 रिक्त पदांसाठी 16 नामांकित कंपन्यांकडून थेट मुलाखती*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार, आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम (भारत) आणि शबरीमाता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नवापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 25 नोव्हेंबर 2026 रोजी‘जिल्हास्तरीय पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा शबरीमाता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नवापूर (जि. नंदुरबार) येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत पार पडणार आहे. या रोजगार मेळाव्यात दहावी उत्तीर्ण, बारावी, कोणत्याही शाखेचा आयटीआय, डिप्लोमा किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधारक उमेदवारांसाठी एकूण 555 रिक्त पदांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. प्रत्यक्ष मुलाखती व चाचणीद्वारे निवड करण्यासाठी विविध 16 कंपन्या व आस्थापनांचे नियुक्ती अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच, कौशल्य विकास व स्वयंरोजगाराच्या संधींबाबत विविध महामंडळांचे स्टॉल्स उभारून अर्थसहाय्य योजनांचे मार्गदर्शनही केले जाणार आहे. सहभागी कंपन्या व उपलब्ध रिक्त पदे, बजाज ऑटो लिमिटेड (चाकण, पुणे) 40 पदे, जेसीबी (तळेगाव, पुणे) 55 पदे,
एसबीआय क्रेडिट कार्ड (पुणे / नाशिक) 30 पदे, हूप इंडिया प्रा. लि. (चाकण, पुणे) 55 पदे, टाटा गोशन (चाकण, पुणे) 30 पदे, टाटा मोटर्स (पुणे) 25 पदे, आयएसी (नाशिक) 30 पदे, बजाज अॅन्ड सन्स (नाशिक) 20 पदे, अस्तेमो इंडिया प्रा. लि. (जळगाव) 35 पदे,
लिग्रांड प्रा. लि. (जळगाव) 30 पदे,
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक 45 पदे, महिंद्रा अँड महिंद्रा (नाशिक) 35 पदे, पूनावाला फिनटेक (पुणे) 35 पदे, यस बॉस (बँकिंग अँड फायनान्स सर्व्हिसेस इन्शुरन्स, पुणे) 25 पदे, नवभारत फर्टिलायझर 25 पदे, स्टेट बँक ऑफ मॉरिशस (मुंबई) 40 पदे,
इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी रिझ्युमे/बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्रे, आधार कार्ड आणि सेवायोजन नोंदणीच्या छायाप्रतीसह सकाळी 10 वाजता मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहावे. ज्या उमेदवारांनी अद्याप सेवायोजन नोंदणी केलेली नाही, त्यांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोकरी साधक म्हणून नोंदणी करावी. ज्यांनी यापूर्वी रोजगार महास्वयंम पोर्टलवर नोंदणी केली आहे, त्यांनी सुधारित संकेतस्थळावर 15 अंकी नोंदणी क्रमांक टाकून लॉग-इन करावे आणि मोबाईल व आधार क्रमांकाची पडताळणी पूर्ण करावी. त्यानंतर पोर्टलवरील 'जॉब फेअर' टॅबवर क्लिक करून 'जिल्हास्तरीय पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा' अंतर्गत पात्रतेनुसार संबंधित कंपन्यांच्या पदांसाठी अर्ज करावा. नोंदणी किंवा अर्जासंदर्भात अडचण आल्यास उमेदवारांनी 02564-295801 या कार्यालयीन दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. नोकरी इच्छुक उमेदवारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मुलाखती द्याव्यात आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता (नंदुरबार) विभागाचे सहायक आयुक्त सुरज महाजन यांनी केले आहे.



