*नंदुरबार प्रकल्पांतर्गत आश्रमशाळांची शाळा दत्तक पालक अधिकारी यांच्याकडून पाहणी, शैक्षणिक गुणवत्ता, स्वच्छता आणि विद्यार्थी कल्याण सुविधांचा घेतला आढावा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार प्रकल्पांतर्गत आश्रमशाळांची शाळा दत्तक पालक अधिकारी यांच्याकडून पाहणी, शैक्षणिक गुणवत्ता, स्वच्छता आणि विद्यार्थी कल्याण सुविधांचा घेतला आढावा*
*नंदुरबार प्रकल्पांतर्गत आश्रमशाळांची शाळा दत्तक पालक अधिकारी यांच्याकडून पाहणी, शैक्षणिक गुणवत्ता, स्वच्छता आणि विद्यार्थी कल्याण सुविधांचा घेतला आढावा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार अंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळांचे शैक्षणिक वर्ष 2026-27 चे द्वितीय सत्र सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार यांच्या आदेशानुसार नियुक्त करण्यात आलेल्या ‘शाळा दत्तक पालक अधिकारी व कर्मचारी’ यांनी 19 नोव्हेंबर रोजी संबंधित आश्रमशाळांना प्रत्यक्ष भेट देऊन शाळांच्या कामकाजाची सविस्तर पाहणी केली. शिक्षक, पालक आणि शाळा व्यवस्थापनाशी संवाद, पाहणी दरम्यान दत्तक पालक अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक, अधीक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि पालक यांची संयुक्त बैठक घेतली.विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविणे, नियमित उपस्थिती टिकवून ठेवणे तसेच शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
भौतिक सुविधा आणि स्वच्छतेची तपासणी, आश्रम शाळांच्या इमारती, मुला-मुलींची वसतिगृहे, शौचालये, स्नानगृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आर.ओ. फिल्टर, सौरऊर्जा यंत्रणा आणि सीसीटीव्ही प्रणाली कार्यान्वित असल्याची प्रत्यक्ष खात्री करण्यात आली. तसेच स्वयंपाकगृह, कोठीगृह आणि शाळा परिसरातील स्वच्छतेची पाहणी करण्यात आली. आवश्यक किरकोळ दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या सुविधा, आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्य,
विद्यार्थ्यांना शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणारे गणवेश, पुस्तके, शैक्षणिक साहित्य, भोजनाचा दर्जा तसेच झोपण्यासाठी असलेली बंकबेड व गाद्यांची व्यवस्था यांची तपासणी करण्यात आली. यासोबतच विद्यार्थ्यांचे आरोग्य कार्ड, नियमित आरोग्य तपासणी आणि शाळा परिसरातील सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजनांचाही आढावा घेण्यात आला. आश्रम शाळांमधील शैक्षणिक वातावरण अधिक गुणवत्तापूर्ण करण्यासह विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी- सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने ही पाहणी करण्यात आली. अशी माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबारचे प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.



