*मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2.0 मधून आदर्श गावांची निर्मिती करा-डॉ.सुप्रिया गावित,आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते तालुकास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन,सरपंच व ग्रामसेवकांचा à
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2.0 मधून आदर्श गावांची निर्मिती करा-डॉ.सुप्रिया गावित,आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते तालुकास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन,सरपंच व ग्रामसेवकांचा à
*मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2.0 मधून आदर्श गावांची निर्मिती करा-डॉ.सुप्रिया गावित,आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते तालुकास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन,सरपंच व ग्रामसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग, ग्रामविकासासाठी लोकसहभाग,पारदर्शकता आणि प्रभावी नियोजन आवश्यक,सरपंच व ग्रामसेवकांना डॉ. सुप्रिया गावित यांचे आवाहन*
शहादा(प्रतिनिधी):-मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2.0 च्या माध्यमातून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधून प्रत्येक गाव आदर्श, स्वयंपूर्ण आणि विकसित बनविण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी केले.
ग्रामविकास व पंचायत राज विभाग, पंचायत समिती शहादा, जिल्हा नंदुरबार यांच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2.0 अंतर्गत आयोजित तालुकास्तरीय कार्यशाळेच्या अध्यक्ष स्थानावरून त्या बोलत होत्या. या कार्यशाळेचे उद्घाटन नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सभापती हेमलता शितोळे, गटविकास अधिकारी महेश पोदार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक आणि संबंधित अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मार्गदर्शन करताना डॉ. सुप्रिया गावित म्हणाल्या की, ग्रामपंचायत ही ग्रामीण विकासाचा मुख्य आधार असून गावाचा विकास केवळ रस्ते, इमारती आणि मूलभूत सुविधांपुरता मर्यादित न राहता सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि पर्यावरणपूरक अशा सर्वच क्षेत्रांत झाला पाहिजे. प्रत्येक गावाने आपल्या स्थानिक गरजा ओळखून विकासाचे नियोजन करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2.0 हे ग्रामपंचायतींना अधिक सक्षम, स्वयंपूर्ण, पारदर्शक आणि लोकाभिमुख बनविण्याचे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. या अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन, डिजिटल सुविधा आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यांसारख्या बाबींना प्राधान्य देणे गरजेचे आहे.
प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या गावाच्या गरजा आणि उपलब्ध संसाधनांचा विचार करून विकासाचे नियोजन करावे. ग्रामसभा अधिक सक्षम करावी, गावातील प्रत्येक घटकाचा विकासप्रक्रियेत सहभाग वाढवावा आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा. सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांनी समन्वयाने काम केल्यास गावाचा शाश्वत विकास साधता येईल, असे प्रतिपादन डॉ. सुप्रिया गावित यांनी केले. गाव स्वच्छ, सुंदर, हरित,आरोग्यदायी आणि सुविधायुक्त बनविण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा. अभियान हे केवळ शासकीय उपक्रम म्हणून न राबवता लोक चळवळीचे स्वरूप देऊन प्रत्येक गावाच्या विकासात ग्रामस्थांचा सहभाग सुनिश्चित करावा, असे आवाहनही त्यांनी केले. या तालुकास्तरीय कार्यशाळेत अभियानाची उद्दिष्टे, अंमल बजावणीची प्रक्रिया, ग्रामपंचायतींची भूमिका, विकास कामांचे नियोजन आणि लोक सहभागाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तालुक्यातील सर्व सरपंच आणि ग्रामसेवकांनी अभियानाची प्रभावी अंमल बजावणी करून आपल्या गावाला विकासाच्या दिशेने पुढे नेण्यासाठी सक्रिय योगदान द्यावे, यावर यावेळी भर देण्यात आला.
कार्यक्रमास तालुक्यातील सर्व सरपंच,ग्रामसेवक, पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



