*एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा*
*एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथे ,19 नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील सर्व पुरुष शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमात पुरुषांचे समाजातील योगदान, त्याग, कर्तृत्व आणि जबाबदाऱ्या यांचा गौरव करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय पुरुष दिन हा पुरुषांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याबरोबरच त्यांच्या भावना, भूमिका आणि योगदान यांचा आदर करण्याचा दिवस आहे. तसेच स्त्री-पुरुष समानता आणि परस्पर सन्मानाचा संदेश या दिनाच्या माध्यमातून देण्यात आला.
याप्रसंगी शाळेतील महिला शिक्षिकांच्या वतीने सर्व पुरुष शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमातून स्त्री-पुरुष समानता, परस्पर सहकार्य आणि सन्मानाची भावना अधोरेखित करण्यात आली.
कार्यक्रमास शाळेच्या प्राचार्या सौ. नूतनवर्षा राजेश वळवी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.



