*प्रारूप मतदार यादीतून वगळलेल्या मतदारांना अंतिम मतदार यादीत येण्यासाठी संधी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*प्रारूप मतदार यादीतून वगळलेल्या मतदारांना अंतिम मतदार यादीत येण्यासाठी संधी*
*प्रारूप मतदार यादीतून वगळलेल्या मतदारांना अंतिम मतदार यादीत येण्यासाठी संधी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरीकांना कळविण्यात येते की, प्रारूप मतदार यादीत (ASDD) Absent, Shifted, Dead, Duplicate व इतर कारणामुळे एकूण 188747 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. अशा मतदारंना भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य व अवर सचिव तथा उप मुख्य निवडणूक अधिकारी यांचेकडील पत्रान्वये (18 नोव्हेंबर 2026) नंदुरबार जिल्ह्यात विशेष फेरफार (SIR-2026) अंतर्गत मतदारांच्या गणनेबाबतचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये ज्या मतदारांची नावे वगळण्यात आली आहे त्यांना पुन्हा एकदा अंतिम मतदार यादीत येण्यासाठी संधी देण्यात येत आहे. संबंधित मतदारंनी आपले Enumeration Form (गणना पत्रक) भरून 30 नोव्हेबर 2026 पर्यंत आपल्या BLO कडे जमा करावे. असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी, नंदुरबार यांच्यामार्फत करण्यात येत आहे.



