*एन.टी.व्ही.एस. फार्मसीच्या विद्यार्थ्याची विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धेत यशस्वी कामगिरी; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*एन.टी.व्ही.एस. फार्मसीच्या विद्यार्थ्याची विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धेत यशस्वी कामगिरी; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*
*एन.टी.व्ही.एस. फार्मसीच्या विद्यार्थ्याची विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धेत यशस्वी कामगिरी; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*
नंदुरबार(प्रतिनिधी):-डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथे आयोजित विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धेत नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित एन.टी. व्ही.एस. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, नंदुरबार येथील पदवीपूर्व (UG) विद्यार्थी लतेश सुरेश मकवाना यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. मानवविद्या, भाषा व ललित कला या विभागातून त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या यशामुळे त्यांची राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेसाठी निवड झाली आहे. लतेश यांनी 'बोलकी भिंत' या नाविन्यपूर्ण प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पारंपरिक भित्तिचित्रांचे दस्तऐवजीकरण, स्थानिक कला व संस्कृतीचे जतन तसेच सांस्कृतिक वारशाबद्दल जनजागृती करण्याचा अभिनव प्रयत्न केला आहे. त्यांच्या या संकल्पनेला विद्यापीठस्तरावर विशेष दाद मिळाली. या प्रकल्पासाठी त्यांना मार्गदर्शक प्रा. तेजल पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, तर प्रा. किशोर राठी यांनी प्रकल्पाच्या पूर्णत्वापर्यंत आवश्यक ते सहकार्य केले. या दोघांच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे प्रकल्प अधिक प्रभावीपणे साकार होण्यास मदत झाली. या विशेष यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी, उपाध्यक्ष मनोज रघुवंशी, सचिव बी. के. पाटील, संस्थेचे समन्वयक डॉ. एम . एस. रघुवंशी आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. वैशाली डी. शेवाळे यांनी लतेश मकवाना तसेच मार्गदर्शक प्राध्यापकांचे अभिनंदन केले. संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही या यशाचे कौतुक करून विद्यार्थिनींच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



