*जिल्ह्यात कोतवाल पदासाठी लेखी परीक्षा,आता 17 जानेवारी 2027 रोजी होणार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्ह्यात कोतवाल पदासाठी लेखी परीक्षा,आता 17 जानेवारी 2027 रोजी होणार*
*जिल्ह्यात कोतवाल पदासाठी लेखी परीक्षा,आता 17 जानेवारी 2027 रोजी होणार*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील महसूल सेवक (कोतवाल) या पदाच्या 45 रिक्त जागांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आता ही परीक्षा 15 नोव्हेंबर 2026 ऐवजी 17 जानेवारी 2027 रोजी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. महसूल सेवक (कोतवाल) पदाच्या 45 जागांसाठी जिल्हाभरातून एकूण 2 हजार 448 अर्ज प्राप्त झाले होते. आधी ठरलेल्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा रविवार, 15 नोव्हेंबर 2026 रोजी नंदुरबार शहरातील 5 परीक्षा केंद्रांवर होणार होती. तथापि, शासनाच्या सहसचिवांच्या 12 नोव्हेंबर 2026 रोजीच्या पत्रान्वये परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. नवीन सुधारित वेळापत्रकानुसार आता ही परीक्षा रविवार, 17 जानेवारी 2027 रोजी पार पडणार आहे. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक तसेच शासनाकडून प्राप्त होणाऱ्या इतर नवीन सूचना nandurbar.bhartiportal.org या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
सर्व संबंधित परीक्षार्थींनी बदललेल्या परीक्षा दिनांकाची नोंद घेऊन त्यानुसार तयारी करावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी केले आहे.



