*कळसवली ग्रा.पं ची जिल्ह्यात बाजी 50 लाखांचा प्रथम पुरस्कार जाहीर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कळसवली ग्रा.पं ची जिल्ह्यात बाजी 50 लाखांचा प्रथम पुरस्कार जाहीर*
*कळसवली ग्रा.पं ची जिल्ह्यात बाजी 50 लाखांचा प्रथम पुरस्कार जाहीर*
ओणी(प्रतिनिधी):-मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सन 2025 -26 अंतर्गत राजापूर तालुक्यातील कळसवली ग्रामपंचायतीने रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत 50 लाख रुपयांच्या जिल्हास्तरीय अत्युत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. ग्रामपंचायतीने गेल्या काही वर्षांत सातत्याने राबविलेल्या विविध विकासकामांची शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची आणि प्रशासकीय नियोजनाची शासनस्तरावर दखल घेण्यात आली आहे.
ग्रामविकास विभागाने 6 नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार पुरस्कारासाठी कळसवली ग्रामपंचायतीची निवड निश्चित झाली. हा पुरस्कार म्हणजे कळसवली गावातील प्रत्येक व्यक्तीच्या एकजुटीचा, मेहनतीचा आणि सामूहिक प्रयत्नांचा सन्मान आहे. या यशामध्ये विशेष योगदान देणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी सोनाली आराख यांचे सर्वप्रथम अभिनंदन त्यांनी घेतलेली मेहनत, केलेले योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा निश्चितच कौतुकास्पद आहे.
या संपूर्ण प्रवासात माननीय आमदार किरण सामंत यांचे लाभलेले मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य ग्रामपंचायतीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे ग्रामपंचायतीच्या विकासकामांना आणि विविध उपक्रमांना दिशा मिळण्यास मदत झाली.त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी रानडे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) पाटील यांचे लाभलेले मोलाचे मार्गदर्शन, सहकार्य आणि प्रोत्साहन यांचाही या यशामध्ये महत्त्वाचा वाटा आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे ग्रामपंचायत कळसवलीला विविध विकासकामे आणि शासकीय अभियानांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी दिशा मिळाली.
याचबरोबर ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननीय सदस्य, उपसरपंच, ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील सर्व बचत गट, सर्व ग्रामस्थ, गावातील शासकीय कर्मचारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (BDO), सहाय्यक गटविकास अधिकारी, सर्व विस्तार अधिकारी, पंचायत समितीतील सर्व ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी तसेच वेळोवेळी मार्गदर्शन करणारे सर्व मार्गदर्शक सरपंच या सर्वांचे सहकार्य, मार्गदर्शन आणि सामूहिक प्रयत्नांमुळे आज ग्रामपंचायत कळसवलीचा नावलौकिक संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात झाला आहे. सरपंच म्हणून माझ्यासाठी हा अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. हा पुरस्कार कोण्या एका व्यक्तीचा नसून संपूर्ण कळसवली गावाचा आहे. गावातील प्रत्येक घटकाने दिलेले योगदानामुळे हे शक्य झाले या यशाचे खरे मानकरी तेच आहेत सहकार्य करणाऱ्या सर्वांचे सरपंच देवेश तळेकर यांनी आभार मानले आहेत.



