ताजा खबरे:
*विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एक रुपया गोळा करून स्वयंपाकी मावशींना दिली दिवाळीची साडी भेट*
*राजापूरची गंगा देवस्थान स्वच्छता मोहीम उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न*
*राजापूर पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीसाठी स्वमालकीची जागा मंजूर पालकमंत्री उदय सामंत,आमदार किरण सामंत यांचा सततचा पाठपुरावा यशस्वी*
*ताम्हाणे फाटा ते मूर सुतारवाडी रस्त्याच्या कामास प्रारंभ,ग्रामस्थांमध्ये समाधान*
*ऊस दर आंदोलनाचे राजकारण, समशेरपूर आयन शुगरचे परिसरास लाभलेले विकासात्मक योगदान आणि सामंजस्याचा मार्ग काढावा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*राजापूरची गंगा देवस्थान स्वच्छता मोहीम उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*राजापूरची गंगा देवस्थान स्वच्छता मोहीम उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न*

  • Share:

*राजापूरची गंगा देवस्थान स्वच्छता मोहीम उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न*
राजापूर(प्रतिनिधी):-संस्थान श्री गंगामाई देवस्थान उन्हाळे, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान राजापूर आणि राजा शिवछत्रपती परिवार रत्नागिरी, यांच्या संयुक्तिक स्वछता मोहीम राजापूरच्या पवित्र गंगा तीर्थ क्षेत्री मोठया उत्साहात आणि शिस्तीत पार पडली.
यावेळी गंगा देवस्थानाचे अध्यक्ष गंगापुत्र श्रीकांत घुगरे यानी उन्हाळे ग्रामदेवता श्री महालक्ष्मी व गंगामाईचे पूजन केले आणि परिसरातील श्रीदेव रामेश्वर, श्री दत्तप्रभु, स्थानदेवता, क्षेत्रपाल देवता यांना श्रीफळ वाढवून  प्रार्थना करण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश मयेकर, राजा शिवछत्रती परिवार रत्नागिरी विभाग प्रमुख दिनेश कुरटे यांनीही पूजन केले. यानंतर शिववंदना घेण्यात आली यामध्ये प्रेरणामंत्र आणि ध्येय मंत्र म्हणण्यात आला. यानंतर छत्रपती शिवरायांचा जयजयकार करून स्वच्छता मोहिमेला सुरवात झाली. दहा जणांचा एक गट असे पाच गट करून पूर्ण गंगाक्षेत्राची व सर्व कुंडांची स्वच्छता स्वच्छता करण्यात आली. हर हर महादेव आणि गंगामाईचा उदो उदो अशा जयघोषात व उत्साहात आणि शिस्तीत स्वच्छता सुरु होती. या मोहिमेच्या नियोजनासाठी मंदार बावधनकर व अलंकार मयेकर या शिलेदारांनी इतर सहकारी यांच्या मदतीने हि जबाबदारी पार पाडली. या मोहिमेच्या आयोजनातील चहा-बिस्कीट, नाष्टा, सुका खाऊ यासाठी समाजातील अनेक शिवप्रेमीनी उत्स्फूरपणे मदत केली. दुपारच्या महाप्रसादाची व्यवस्था गंगा संस्थांनाच्या वतीने करण्यात आली होती. यावेळी हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानने सर्वांच्या सोबत राजापूरसह, महाराष्ट्रातील व देशातील दुष्काळ दूर होऊ देत असे कळकळीचे गाऱ्हाणे गंगामाईला घालण्यात आले, आणि गंगामाई हाकेला धावली व रात्री राजापूरात पावसाचे जोरदार आगमन झाले आणि एक प्रकारचा सुखद गारवा झाला. यावेळी दिवसभरात राजापूरातील अनेक मान्यवरानी यावेळी या स्वच्छता मोहिमेला भेट दिली आणि छत्रपती शिवरायांना आदर्श मानून, देव, देश, धर्मासाठी कार्य करणाऱ्या सर्व लहानथोर, अबालवृद्ध, तरुण महिला व पुरुष शिलेदारांचे कौतुक केले आणि पवित्र अश्या गंगा देवस्थान आणि गंगेच्या कुंडांची स्वच्छता आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. बाराव्या शतकात शिलाहर राजाने बांधकामानंतर व शिवकाळात छत्रपती शिवरायांनी दिलेल्या राजाश्रयानंतर, आज अनेक शताकानंतर गंगा संस्थान जीर्णोद्धारच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र पहायला मिळते. यावरती देवस्थानशी चर्चा केल्यावरती या ठिकाणी जीर्णोद्धाराचा प्रस्ताव व आराखडा तयार असून, लवकरच सुरवात करणार असल्याची माहिती गंगा संस्थांनाच्या वतीने देण्यात आली. यासाठी हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान राजापूर, या कार्यात सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. यावेळी गंगापुत्र राहुल काळे, रोहित घुगरे, केदार साने, महेश सप्रे उपस्थित होते. प्रतिष्ठान च्या वतीने विवेक गुरव, मोहन घुमे, प्रसन्न देवस्थळी, निकेश पांचाळ, निखिल चव्हाण, अभिजित नार्वेकर, वैभव तोरस्कार तसेच मंदिर अभ्यासक व इतिहास संशोधक विनोद पवार, कोदवली सरपंच श्रीमती प्रणोती भोसले, सुभाष नवाळे, माधवी हर्डीकर, संदेश टिळेकर, रघुवीर बापट व जायदे गुरुजी, माजी नगरसेवक विजय हिवाळकर, पवी बोटले तसेच राजा शिवछत्रपती परिवारातर्फे रत्नागिरी, चिपळूण, मुबंई, गावखडी, रनपार, कशेळी, आडीवरे या ठिकाणाहून अनेक शिलेदार उपस्थित होते. जवळपास एकूण 70 जणांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग दर्शवला. यावेळी राजापूरातील स्थानिकांचा सहभाग कमी असल्याचे प्रकर्षाने जाणवले. याबद्दल उपस्थितानी चिंता व्यक्त केली. यानंतर एकमेकांशी संवाद साधत शिवकार्य याची माहिती देत, यासाठी सहकार्य करणाऱ्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. यानंतर गंगामाई देवस्थानाला वंदन करून व शिवरायांचा जयजयकार करून, शिलेदारांनी एकमेकांचा निरोप घेत, पुढील मोहिमेत लवकरच भेटू असे म्हणून मोहिमेची सांगता करण्यात आली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एक रुपया गोळा करून स्वयंपाकी मावशींना दिली दिवाळीची साडी भेट*
November, 04 2026
*राजापूरची गंगा देवस्थान स्वच्छता मोहीम उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न*
November, 04 2026
*राजापूर पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीसाठी स्वमालकीची जागा मंजूर पालकमंत्री उदय सामंत,आमदार किरण सामंत यांचा सततचा पाठपुरावा यशस्वी*
November, 04 2026
*ताम्हाणे फाटा ते मूर सुतारवाडी रस्त्याच्या कामास प्रारंभ,ग्रामस्थांमध्ये समाधान*
November, 04 2026
*ऊस दर आंदोलनाचे राजकारण, समशेरपूर आयन शुगरचे परिसरास लाभलेले विकासात्मक योगदान आणि सामंजस्याचा मार्ग काढावा*
November, 04 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज